रद्दीवाल्याकडून पुस्तके विकत घेऊन अभ्यास केला आणि अधिकारी झाला, मुलाच्या शिक्षणासाठी वडील कि’ड’नी देखील विकायला तयार होते..

भारतात दरवर्षी शेकडो लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत असतात. या स्पर्धा परीक्षांची तयारी करणे म्हणजे सोपे काम नाही. यामध्ये आपल्याला खडतर अभ्यास करणे तसेच अभ्यासाला योग्य दिशा देऊन त्याचे नीट नियोजन करणे आणि त्याचबरोबीने प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असणे अत्यंत गरजेचे असते.

यामध्ये देखील जर कौटुंबिक परिस्थिती आर्थिक दृष्ट्या समृद्ध असेल तर आपल्याला थोडा दिलासा मिळतो. परंतु जर कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असेल तर यामध्ये आपल्यासमोर अनेक अडचणी येणाची शक्यता असते. परंतु, काहीजण अथक परिश्रम करून यामध्ये यश मिळवतात. अशा गोष्टी लोकांना प्रेरणा देतात आणि संघर्ष करायला शिकवत असतात. आज आपण अशाच एका मुलाची कहाणी पाहणार आहोत जी वाचून तुम्ही देखील भावुक व्हाल.

झारखंड येथील बोकारो जिल्ह्यातील इंद्रजित यांचा जन्म अत्यंत गरीब कुटूंबात झाला. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. पावसाळ्यात तर त्यांचे घर राहण्याजोगेही नसायचे. अशा प्रकारे घराची बिकट अवस्था असल्यामुळे इंद्रजित त्यांच्या आई आणि बहिणींसोबत आपल्या मामाच्या गावी राहायला गेले.

परंतु, इंद्रजित परत येऊन आपल्या वडिलांसोबत राहू लागले. त्यांनी आपल्या वडिलांसोबत आपले घर दुरुस्त केले. अशा परिस्थितीमध्ये इंद्रजित यांनी आपल्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. घराच्या अर्थिक परिस्तिथीमुळे त्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या मात्र, हार न मानता ते सगळ्या समस्यांना सामोरे जायचे. त्यांच्याकडे नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी देखील पैसे नसायचे. अशा वेळेस ते रद्दीवाल्याकडून जुनी पुस्तके विकत घेऊन आपला अभ्यास करत असत.

लहानपणापासूनच इंद्रजित अभ्यासात खूप हुशार होते. त्यांना नेहमीच उच्चशिक्षित होऊन कुटुंबाचे नाव उज्वल करावे अशी इच्छा होती. त्यांनी शाळेत असताना एकदा त्यांच्या शिक्षकांना प्रश्न विचारला कि, जिल्ह्याचा प्रमुख कोण असतो? तेव्हा त्यावर शिक्षकांनी डीएम असे उत्तर दिले. त्यावेळीच इंद्रजित यांनी आयएएस बनण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने तयारीला सुरुवात केली.

इंद्रजित यांच्या वडिलांचे देखील स्वप्न होती कि, इंद्रजित यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे. मात्र, यासाठी खूप पैसे लागणार हेही त्यांना माहीत होते. इंद्रजित यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला उच्चशिक्षण मिळावे म्हणून त्यांची जमीन विकली. एवढेच नव्हे तर केवळ मुलाच्या उत्तम शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी सांगितले कि, “बाळा तू फक्त मन लावून चांगला अभ्यास कर, तुझ्यासाठी मी जमीनच काय माझी कि’ड’नी सुद्धा विकायला तयार आहे.” वडिलांचे हे बोलणे ऐकून इंद्रजित खूप भावुक झाले होते असे त्यांनी सांगितले.

त्यांनतर त्यांनी आपल्या परिस्थितीची जाणिव ठेवत 2008 साली खूप तयारी करून UPSC मध्ये 111 क्रमांक प्राप्त केला. खरेतर त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते परंतु, ते आयपीएस झाले. यानंतर त्यांना झारखंड केडर मिळाले आता इंद्रजित हे आपले कार्य उत्तमरित्या बजवत आहेत.

इंद्रजित सांगतात कि,” संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच परंतु, हाच संघर्ष माणसाला अधिक मजबूत बनण्यास मदत करतो.” इंद्रजित हे नेहमीच आपल्या कार्यामुळे चर्चेत असतात. अनेक तरुणांचे ते प्रेरणास्थान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page