गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीचा झाला दु’र्दै’वी मृ’त्यू..

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई या भागात श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. शुभम इंगळे यांना आवेरा नावाची अवघ्या 10 महिन्यांची मुलगी होती. मात्र, अचानक काळाने त्या चिमुकलीवर घा’ला घातला आणि होत्याचे नव्हते झाले.

शनिवारी रात्री आवेरा हिला आंघोळीसाठी एका भांड्यात गरम पाणी काढण्यात आले होते. गरम पाण्याच्या भांड्याजवळच आवेरा असल्याने तिचा त्या भांड्याला धक्का लागून गरम पाणी तिच्या अंगावर सांडले.

अचानक एवढे गरम पाणी अंगावर सांडल्यामुळे आवेरा गंभीररीत्या भा’ज’ली गेली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर आवेराच्या आईवडिलांना याचा मोठा धक्का बसला.  मात्र, कुटुंबियांनी आवेराला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यांनतर तीन दिवस आवेरावर उपचार सुरू होते. तीन दिवस मृ’त्यु’शी झुंज देत अखेर मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री आवेराने आपले प्रा’ण सो’ड’ले. या घटनेची बातमी तिच्या आईला समजताच त्यांना याचा जबर धक्काच बसला आहे.

अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीच्या आकस्मित मृ’त्यू’ने तिच्या आईवडिलांना खूप दुःख झाले आहे. तसेच संपुर्ण इंगळे कुटुंबावर शो’क’का’ळा पसरली आहे. आवेराच्या मृ’त्यू’ची नोंद सरकारवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चिमुकलीच्या अशा दुर्दैवी अं’ता’नंतर आजूबाजूच्या परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page