तब्बल 72 सदस्य असलेल्या या एकत्रित कुटुंबाची जगभरात चर्चा, एकाच छताखाली न भांडता गुण्यागोविंदाने राहतात..

पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत अस्तिवात होती आणि भारतातील कुटुंबव्यवस्था ही जगात आदर्श मानली जात होती. परंतु, जसजशी परिस्थिती बदलत गेली, काळ बदलला तसतशी माणूस प्रगती करण्याच्या दिशेने शहरात स्थलांतर करू लागला. त्यामुळे मोठी कुटुंब मोडकळीस आली. मात्र, याला अपवाद ठरले आहे महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातील डोईजोडे कुटुंब.

महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातील डोईजोडे कुटुंब हे मूळचे कर्नाटक मधील असून ते गेले 100 वर्षे सोलापूर मध्ये स्थायिक झालेले आहेत. या डोईजोडे कुटुंबात 72 सदस्य एकत्रित एका छताखाली गुण्यागोविंदाने राहत आहेत. या घरात सध्या चार पिढ्या एकत्र राहत आहेत. आजी-आजोबा, काका-काकी, त्यांची मुले, त्यांची नातवंडे असे सर्व एकत्रीत राहतात.

डोईजोडे कुटुंबाचे अनेक व्यवसाय आहेत तसेच त्यांची अनेक कपड्यांची दुकाने आहेत. या परिवाराला रोज जेवणासाठी सुमारे 1500 रुपयांचा भाजीपाला लागतो, तसेच 10 लिटर दूध लागते. त्यांना स्वयंपाक करत असताना एका वेळी सहा ते सात स्टोव्ह पेटवावे लागतात.  कुटुंबातील सगळ्यांचा स्वयंपाक हा एकत्रितच केला जातो.

या घरातील प्रत्येक मुलामुलींना त्यांचा हा एवढा मोठा परिवार म्हणजे आनंदाचा ठेवा वाटतो. परंतु, सुरुवातीला या घरातील स्त्रियांना एवढं मोठं कुटूंब पाहून भीती वाटायची. पण हळूहळू त्यांना या परिवाराची आवड निर्माण झाली. त्यांना घरातील कामे करणे आवडू लागले. पुरुषांची देखील महिलांना उत्तमप्रकारे साथ लाभत असते.

या घराचे महिन्याचे बिल हे 40-50 हजार रुपये इतके येते. खर्च कितीही असला तरी हे कुटुंब एकमेकांत विभाजन करून सामंजस्याने सगळे खर्च नीट सांभाळत असतात. या घरातील मुलांना खेळण्यासाठी किंवा अभ्यासासाठी कोणा बाहेरच्या मित्रांची गरज कधीच भासत नाही.

सध्या हे कुटुंब देशात आणि संपूर्ण जगात व्हायरल होत आहे. अनेक अहवालांमध्ये या कुटुंबांचा उल्लेख केला जातो. हे कुटुंब सो’श’ल मी’डि’या’व’र नेहमीच चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page