गवंडयाच्या मुलाची भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोमध्ये झाली निवड, आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू..

आपण कठीण परस्थितीमध्ये संकटांचा सामना करत जिद्दीने मेहनत करत पुढे जात राहिलो तर नक्कीच एक दिवस आपण यशाचे शिखर गाठतो. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट नाशिकच्या ग्रामीण भागातून समोर आली आहे. हल्लीच भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये अनेक बटालियन मधून केवळ 12 जणांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये नाशिकमधील ग्रामीण भागातील एका गवंडयाचा मुलगा जयदीप जाधव हा मराठा बटालियनच्या माध्यमातून पॅरा कमांडोच्या यादीत सामील झाला आहे.

जयदीप जाधव हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा रहिवासी आहे. जयदीचे वडील हे लासलगाव येथील पंचक्रोशीत गवंडी काम करतात. तसेच आई अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करते.

कौटुंबिक परिस्तिथी फारशी चांगली नसूनही मेहनत आणि जिद्दीने भारतीय सैन्यदलातील अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत जयदिपने पॅरा कमांडोमध्ये सहभागी होण्याचा बहुमान पटकावला आहे.

संपूर्ण भारतातून निवडलेल्या सैनिकांमधून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करत जयदीपने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्या आईवडिलांना त्याचा खूप आनंद झाला असून त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

त्याने मिळवलेल्या या यशानंतर त्याचे गावकऱ्यांनी अभिनंदन करत त्याचा सत्कार केला आहे. सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील जयदीप वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page