सांगली जिल्ह्यातील अनोखा उपक्रम, गावात भोंगा वाजताच सगळी मुले अभ्यासाला सुरूवात करतात..

मुले घरी असले की सतत टीव्ही बघतात तसेच मोबाईलवर खेळत असतात. पालकांना अनेकवेळा मुलांना अभ्यासासाठी ओरडावे लागत असते. अशी परिस्थिती सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळते. परंतु मुलांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्याचा उपाय मात्र कोणाला ही भेटत नाही. मात्र, सांगली जिल्ह्यात यावर तोडगा म्हणून एक उपक्रम राबवला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव या गावामधील बरीच मुले इंग्रजी माध्यमाची निवड करत आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

मागील दोन वर्षांमध्ये संकट ओढवले होते त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर याचा फार मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. मुलांची अभ्यासातील आवड कमी झालेली दिसून येत आहे.  मुलांना पुन्हा अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून मोहिते वडगाव मधील सरपंचांनी यावर उपाय काढला.

त्यांचा हा विचार त्यांनी गावातील लोकांसमोर मांडला. सगळ्यांनी यावर विचारविनिमय केला आणि मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला मुलांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाअंतर्गत अभ्यासाला दररोज दीड तासाचा वेळ देण्याचे ठरवले गेले.

दररोज याची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगा लावण्यात आला आहे. संध्याकाळी 7 वाजता हा भोंगा वाजवला जातो. 7 वाजले की गावातील सगळी मुले अभ्यास करायला सुरुवात करतात. 7 वाजले की कोणतीच मुले घराबाहेर दिसणार नाहीत याची पूर्ण जबादारी पालकांवर सोपवण्यात आली आहे. तसेच या वेळेत मुले बाहेर दिसलेच तर गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांकडून या मुलांना अभ्यासाची आठवण करून दिली जाते.

पालक देखील मुलांना अभ्यासामध्ये मदत करतात. महिला देखील घरातील काम करत तसेच स्वयंपाक करत वाचन करतात. यामुळे मुलांची अभ्यासाबाबतची आवड वाढली असून कुटुंबामधील संवाद देखील वाढला आहे.

मोहिते वडगाव या गावामध्ये सुरू केलेला हा अनोखा उपक्रम सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. मोहिते वडगाव या गावाने हा अनोखा उपक्रम सुरू करून अनेकांपुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page