वडिलांना होणारा त्रास पाहून वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी या मुलीने अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले, आज आहेत IAS अधिकारी..

प्रत्येकजण स्वप्ने पाहत असतो आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत देखील करत असतो. स्वप्न पूर्ण झाल्यानंतरचा आनंद काही निराळाच असतो. आज आपण अशाच एका महिला आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रतील सोलापूर मधील उपलाई या खेडेगावात राहणाऱ्या रोहिणी ह्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांनी नेहमी आपल्या वडिलांना शेतात भरपूर कष्ट करताना पाहिले आहे.

रोहिणी यांनी लहानपणी शेतकरी असलेल्या वडिलांचा शेतीबाबतचा असहाय्यपणा पाहिला होता. अशिक्षित असल्यामुळे सरकारने दिलेल्या शेतकर्‍यांच्या योजनांचा त्यांना फायदा घेता आला नाही. तेव्हा अवघ्या नऊ वर्षांच्या असलेल्या रोहिणी यांनी वडिलांची मजबुरी पाहून त्यांनी अधिकारी बनण्याचे ठरवले.

रोहिणी अभ्यासात नेहमीच अव्वल असायच्या. त्यांनी आपले दहावीपर्यंत शिक्षण उपलाई येथेच पूर्ण केले. त्यांनतर पुढील शिक्षण त्यांनी सोलापुर मध्ये पूर्ण केले. 2008 मध्ये रोहिणी यांनी आयएएसची तयारी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी कोणत्याही खासगी कोचिंगचा आधार घेतला नाही. 1790 पासून सोलापूर जिल्ह्यात जवळपास 170 जिल्हाधिकारी होऊन गेले.

मात्र, कोणीही महिला अधिकारी तिथे आली नव्हती. रोहिणी या जिल्ह्यातील पहिली महिला जिल्हाधिकारी झाल्या आणि त्यांनी नवीन इतिहास रचला. 2008 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग तमिळनाडूच्या मधुराई येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. रोहिणी यांनी मधुराई जिल्ह्याला राज्यातील पहिले खुले शौचमुक्त जिल्हा बनवले. 2016 मध्ये त्यांना या कामगिरीमुळे पुरस्कार देण्यात आला.

आयएएस अधिकारी व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, असे रोहिणी यांनी सांगितले. आयएएस ऑफिसरच्या प्रशिक्षणासाठी जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, नेहमी लोकांचे कल्याण होईल असेच निर्णय घ्यायचे.

आपल्या एका स्वाक्षरीवर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे हा विचार आधी करायचा. लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार राहण्याचा सल्ला त्यांनी दिला होता, असे रोहिणी सांगतात. रोहणी यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांचे नेहमी कौतुक केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page