पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अकोला येथील आजोबा व नातू दोघेही गेले वाहून..

आता पडत आसलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पर्याय नसल्यामुळे अनेकांना पाण्यातून जी’व’घे’णा प्रवास करावा लागत आहेत. अशीच एक दु’र्दै’वी घटना अकोला येथे घडली आहे. अकोट तालुक्यातील तांदुळवाडी या गावचे रहिवासी प्रभाकर प्रल्हाद लावणे हे आपला नातू आदित्य विनोद लावणे याच्यासोबत मंगळवारी पहाटे म्हैस घेऊन सोनबर्डी येथे गेले होते.

तांदुळवाडी सोनबर्डी नदीच्या परिसरात थोडा पाऊस पडला तरी पूल पाण्याखाली जातो. सोनबर्डी व तांदुळवाडी वाहतुकीसाठी हाच एक पर्याय असल्याने अनेकदा नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना यामधून जी’व’घे’णा प्रवास करावा लागतो. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहाळी नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे पुलावरून देखील पाणी वाहत होते.

असे असूनही आजोबा आणि त्यांच्या नातवाने पुलावरून जाण्याचे धाडस केले. हेच धाडस त्यांच्या जीवावर बेतले. नदीचा प्रवाह जास्त असल्याने नातू नदीच्या प्रवाहात वाहून जात होता, म्हणून त्याला वाचवण्याचा आजोबांनी खूप प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड असल्याने आजोबा देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घडलेल्या प्रकारची माहिती तांदुळवाडी येथील गावकऱ्यांना मिळताच ते सर्व नदीकाठी पोहचेले.

गावकऱ्यांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध घेत असताना आजोबा प्रभाकर लावणे यांचा मृ’त’दे’ह त्यांना सापडला आहे. तर नातू आदित्य अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समजली आहे. त्याचा शोध घेणे अद्यापही सुरूच आहे.

ह्या सर्व घटनेची माहिती मिळताच लावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेल्यामुळे तांदुळवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनबर्डी व तांदुळवाडी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, असे असूनही अद्यापही प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे काम सुरू केलेले नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अकोला जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी, नाल्यांना पुर आले आहेत. त्यामुळे पुराचे पाणी पुलावरून जात असताना नागरिकांनी पुल ओलांडण्याचे जि’व’घे’णे धाडस करू नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page