अवघ्या 31 सेकंदात 75 जिल्ह्यांची नावे सांगणारी ही चिमुकली सध्या सो’शल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..

एखाद्या फोटो मुळे तसेच काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीची कला जगभरात पोहोचू शकते. आज आपण अशाच एका शालेय मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेली मुलगी ही उत्तरप्रदेश येथील देवरिया मध्ये एका सरकारी शाळेत शिकणारी मुलगी आहे. तिचे नाव अंकिता आहे.

लाल रंगाच्या स्कूल युनिफॉर्ममध्ये असलेली आणि पाठीवर बॅग घेतलेली ही मुलगी व्हिडिओच्या सुरुवातीला आपले नाव, शाळेचे नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव सांगते. त्यानंतर पुढे ती अवघ्या 31 सेकंदांमध्ये 75 जिल्ह्यांची नावे सांगते. ही नावे सांगण्याचा तिचा वेग इतका जास्त आहे की काही नावे तर आपल्याला लक्षातही येणार नाहीत.

हा व्हिडिओ पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिची स्मरणशक्ती किती चांगली आहे हे ह्यावरून आपल्याला समजते. विशेष म्हणजे श्वास न घेता एका दमात ही चिमुकली जिल्ह्यांची नावे सांगत असल्याने तिचा श्वासावर किती कंट्रोल असेल देखील आपल्याला पाहायला मिळते.

हा व्हिडिओ ट्विटरवर सिरज नुरानी यांनी पोस्ट केला आहे. एका दिवसांत 4 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो रिट्विट सुद्धा केला आहे. तर काहींनी त्यावर उत्तम प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. केवळ पुस्तकी अभ्यास करुन यश मिळतेच असे नाही, हे या लहानग्या चिमुकलीने खरे करून दाखवले आहे.

हा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल होत आहे तसेच तिच्या या आगळ्यावेगळ्या कौशल्याचे भरभरून कौतुकही होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला या चिमुकल्या अंकिताचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. कित्येक लहान मुलांसाठी ती आज एक प्रेरणा बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page