दिवसरात्र कपडे शिवून आईने दोन्ही मुलांना शिकवले, मुलांनी अधिकारी होऊन आईवडिलांचे स्वप्न केले पूर्ण..

प्रत्येक आई आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी तसेच त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी स्वतः खस्ता खात असते. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत ज्यात आपल्या मुलांना सक्षम बनविण्यासाठी एका आईने रात्रंदिवस एक करून संघर्ष केला आहे. राजस्थानमधील झुंझुनुन येथे राहणारे सुभाष कुमावत हे एक टेलर आहेत.

त्यांचे कपडे शिवायचे एक छोटेसे दुकान आहे. तेथे बसून सुभाष कुमावत आणि त्यांची पत्नी कपडे शिऊन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असत. या दाम्पत्याला पंकज आणि अमित अशी दोन मुले आहेत. पंकज आणि अमित या दोघांनीही आयआयटी दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनतर पंकजने नोएडा येथील एका खासगी कंपनीत नोकरी करण्यास सुरूवात केली होती.

परंतु, दोन्ही भावांचे नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न होते. परंतु, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासमोर खूप मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आईवडिलांनी दिवसरात्र कष्ट केले आणि मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. पंकज आणि अमित या दोघांच्या आईवडिलांना आपल्या मुलांनी मोठे अधिकारी व्हावे अशी इच्छा होती. त्यां

नी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. दिवसरात्र त्यांनी अभ्यास केला आणि अखेर 2018 मध्ये दोघांनीही एकत्रितपणे यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

पंकज आणि अमित सांगतात, “पालकांनी कठीण परिस्थितीत देखील आम्हाला उच्चशिक्षित बनवले. आमची फी, पुस्तके आणि इतर गोष्टी आम्हाला वेळेत मिळाव्यात यासाठी आई रात्रभर कपडे शिवत असत. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते दोघे सतत काम करत असत. आम्ही आज आमच्या पालकांनी केलेल्या संघर्षामुळेच हे लक्ष्य गाठू शकलो. त्यांनी दिवसरात्र कष्ट करून आमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे.”

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि दोघांनीही परिक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. दोघांचा ही आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा फार अभिमान वाटत होता.

या यशाचे सर्व श्रेय हे दोन्ही भाऊ त्यांच्या आईवडिलांना देतात. कठीण परिसथितीतून मार्ग काढत आई प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी पुढे असते, हे आपण नेहमी पाहत असतो. जेव्हा मुलांचा विचार येतो तेव्हा तिच्यात दहा हत्तींचे बळ येते असे म्हणतात. आईच्या चरणी स्वर्ग आहे, असे म्हटले जाते. खरोखर अशा आईला आमचा सलाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page