वायर वूमन म्हणून प्रसिद्ध असलेली ही महिला झपाट्याने विजेच्या खांबावर चढते आणि उतरते..

आज आपण पाहत आहोत की स्त्रिया देखील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जी महिला या जगातील महिलांना पुरुषांइतके सक्षम बनविण्याचे काम करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या उषा जगदाळे यांनी कार्यालयात काम करण्याऐवजी फिल्डवर काम करणे जास्त पंसत केले. उषा या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये लाईन वुमन म्हणून काम करत आहेत. जेणेकरून, लोकांना समस्या आल्यास त्यांना त्या त्वरीत वीज मिळून देऊ शकतील. आपण यापूर्वी कधी कोणत्या स्रीला विद्युत खांबावर चढताना पाहिले आहे का?

परंतु, उषा जगदाळे या कोणत्याही मदतीशिवाय विद्युत खांबावर चढतात आणि उतरताही. एकदा काही कारणास्तव वीज कामगार वेळेवर पोहोचू शकले नव्हते. तेव्हा या वायर वुमन उषा जगदाळे यांनी विद्युत खांबावर चढून मदत केली आणि वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांनतर त्या वायर वुमन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

वायर वुमन उषा या शिडीचा वापर न करता अगदी सहजपणे पॉवर पोलवर चढतात. यापूर्वी हे काम करणारी स्त्री आपण कधी पाहिलीही नसेल. परंतु, उषा या लहानपणापासूनच चपळ आहेत. त्यांना खेळामध्ये देखील खूप रस होता. त्या एक उत्तम खेळाडू असून त्यांनी खेळात 11 सुवर्ण पदके जिंकली आहेत. त्या महाराष्ट्र राज्यस्तरीय खो-खो संघाच्या देखील कर्णधार राहिल्या आहेत.

उषा जगदाळे यांची स्पोर्ट्स कोट्यातून इलेक्ट्रीशियन तंत्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी ऑफिसमध्ये काम केले. त्यांनतर त्यांनी या क्षेत्रात स्वतः अशा प्रकारचे काम करण्याचे निवडले. जेणेकरून लोकांना विनाविलंब वीजसेवा त्वरित मिळू शकेल.

ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये उषा विद्युत खांबावर अगदी सहजपणे चढताना दिसत होत्या. त्यांचा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल झाला होता. विजेच्या खांबावर एका महिलेला अगदी सहजरित्या चढताना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले होते. अनेकांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक देखील केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page