“मी परत केव्हाही कलेक्टर होईन, पण माझी आई मला परत भेटणार नाही” आजारी आईच्या सेवेसाठी या IAS अधिकाऱ्याने नाकारले जिल्हाधिकारी पद..

आई-वडिलांनी केलेल्या प्रेमाची तसेच आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे आणि आपले भविष्य उज्जल व्हावे यासाठी घेतलेली मेहनत, या साऱ्या गोष्टींची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. उच्चशिक्षित झाले की काही मुले आईवडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट विसरतात. बाहेरगावी गेलेली मुले आपल्या आई-वडिलांकडे मागे वळून देखील पाहत नाहीत. आज आपण अशा एका अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या आईसाठी आपले जिल्हाधिकारी पद सोडले.

उत्तरप्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले अनूप कुमार सिंह यांचा जन्म 14 मे 1987 रोजी झाला. आहे. ते लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. अनुप कुमार हे अतिशय शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. मात्र, कामाच्या बाबतीत तितकेच कडक देखील आहेत.

अनुप कुमार सिंह हे 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जबलपूर येते नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी आपले कार्य बजावत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांनी त्यांच्या कामगिरीने प्रशासनाला देखील प्रभावित केले होते. म्हणून त्यांना जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली.

परंतु अचानक अनुप कुमार यांची आई आजरी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आजारी असल्यामुळे अनुप कुमार यांनी आपल्या आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी त्यांची बढती नाकारली.

अनुप कुमार यांनी आपली बढती नाकारली आणि त्यांच्या आईची दिवसरात्र सेवा करू लागेल. त्यांच्या आईने 35 दिवस मृ’त्य’शी झुंज दिली आणि अखेर त्यांनी आपले प्रा’ण सोडले. त्यांनी आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपली बढती नाकारली होती. अनुप कुमार सिंह सध्या खंडावा येथे आपले कार्य बजावत आहेत.

आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यासाठी ते कठोर परिश्रम देखील घेत असतात. परंतु आपल्या आईला अधिक महत्व देत अनुप कुमार सिंह यांनी या पदाचा त्याग केला. गेलेले पद पुन्हा मिळवता येते, परंतु आई नाही. त्यांचे आईवरील प्रेम पाहून सगळेच जण भावूक झाले. याबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक देखील केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page