“जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तुमची आहे”, IAS पतीसाठी पत्नीचा खास मेसेज, मिळाले हे उत्तर…

नुकताच पार पडलेल्या आयएएस अतहर अमीर खान आणि डॉक्टर मेहरीन काझी यांचा विवाहाची सध्या सो’श’ल मी’डि’या’वर तुफान चर्चा सुरू आहे. नुकतेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी आयएएस अधिकारी अतहर अमीर खान आणि डॉक्टर मेहरीन काझी यांचा विवाह संपन्न झाला आहे. हे दोघे ही मूळचे काश्मीरचे आहेत.

मेहरीन काझी या श्रीनगर मधील लालबाजार येथील रहिवासी आहेत. मेहरीन यांनी यूके आणि जर्मनीमधून फार्मसीची पदवी घेतली आहे. या वैद्यकीय क्षेत्रात तसेच फॅशन इंडस्ट्री मध्ये देखील सक्रिय आहेत. मेहरीन या सध्या दिल्लीत कार्यरत आहेत.

इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ तसेच फोटोज् पोस्ट केले आहेत. यामध्ये ते दोघे ही खुप सुंदर दिसत आहेत. अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याचदरम्यान मेहरीन काझी यांनी आपल्या पतीला टॅग करत एक पोस्ट लिहिली आहे, त्यात असे लिहले आहे की, ”मी तुमचा मनापासून स्वीकार केला आहे. मला साताजन्माचे माहीत नाही परंतु जो पर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुमचीच असेन.” अशा सुंदर शब्दात त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे. जे सध्या सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल होत आहे.

आयएएस अधिकारी अतहर अमीर खान यांनी आपल्या पत्नीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यात तू आलीस आणि मी धन्य झालो. तू माझे आयुष्य खूप सुंदर केले आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.” अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page