पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा वयाच्या 23 व्या वर्षी IAS अधिकारी झाला..

आपल्याला जे यश मिळवायचे आहे त्यासाठी आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार हे आपल्याला माहीत असते. कितीही संकट किंवा अडचणी येऊ द्या आपण त्या सर्वांवर मात करुन जिंकणारच असा विश्वास जर आपल्यात असेल तर यश नक्कीच मिळते. आपण आज अशाच एका प्रेरणादायी आयएएस अधिकाऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत.

गोपालगंज येथे राहणारे प्रदीप सिंह हे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयएएस अधिकारी झाले आहेत. गरीब कुटुंबात वाढलेले प्रदीप सिंह यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रदीप यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती. मात्र, प्रदीप यांनी हार न मानता आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याचे ठरवले आणि यासाठी कठोर मेहनत घेतली.

2020 मध्ये प्रदीप सिंह युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी आयएएस अधिकारी झाले. मात्र,  इथपर्यंत येण्याचा त्यांचा मार्ग तितका सोपा नव्हता. त्यांच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांच्या वडिलांनी घर विकले होते आणि त्यातून मिळालेल्या पैशातून प्रदीप यांना दिल्लीला एका कोचिंग क्लासमध्ये पाठवले.

प्रदीप सिंह हे मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. परंतु, त्यांचे कुटुंब इंदूरमध्ये राहते. त्यामुळे प्रदीप यांनी इंदूरमधून शिक्षण पूर्ण केले. प्रदीप यांना बारावीनंतर लगेचच यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला यायचे होते. मात्र, कुटंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे वडिल पेट्रोल पंपावर काम करत होते.

प्रदीप अगदी सहज यूपीएससी परीक्षा देऊ शकतो असा त्यांच्या वडिलांचा ठाम विश्वास होता. परंतु, त्यासाठी त्यांना केवळ चांगले प्रशिक्षण आवश्यक होते. ही बाब प्रदीप यांच्या वडिलांनी ओळखली होती. यामुळे त्यांनी पैसे उभे करण्यासाठी आपले घर विकले आणि त्या पैशातून प्रदीप दिल्लीला येऊन त्यांनी कोचिंग सुरू केले.

यादरम्यान प्रदीप यांनी खूप मेहनत घेतली मात्र, त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश सहन करावे लागले. परंतु, निराश न होता त्यांनी खूप मेहनत केली आणि पुन्हा त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. अखेर या वेळी त्यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांनी संपूर्ण भारतातून 26 वा क्रमांक पटकावला.

त्यांच्या या यशानंतर त्यांचे कुटुंबीय खूप खुश झाले. यानंतर त्यांची आयएएस पदासाठी साठी निवड झाली आणि त्यांनी अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण केले. आज ते अनेक तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page