रात्रंदिवस भट्टीत काम करून वडिलांनी मुलांना शिकवले, आज एक मुलगी आहे अधिकारी तर दुसरी आयटी इंजिनिअर..

प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात अनेक चढ-उतारांचा संघर्ष करावा लागत असतो. काहीजण यात लगेच हार मनातात तर काहीजण त्याला धैर्याने तोंड देत पुढे जात असतात मग यादरम्यान कितीही संकटे आले तरीही ते मागे हटत नाहीत. याचाच प्रत्यय देणारी कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यात भट्टीत काम करणार्‍या वडीलांची तिन्ही मुलं उच्चशिक्षीत आहेत आणो मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट येथील रफळा येथील रहिवासी असलेले हंसराजभाई सोजित्रा हे एका भट्टीत काम करत. हंसराजभाई आणि नंदूबेन या दाम्पत्याला 2 मुली आणि एक मुलगा आहे. आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी वडिल हंसराजभाई यांनी दिवसरात्र भट्टीत काम केले. हंसराजभाई हे स्वत: अशिक्षित होते पण त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यात कोणतीच कमतरता सोडली नाही.

हंसराजभाईंनी यांनी मुलगा आणि मुलींमध्ये कधीही भेदभाव केला नाही. याउलट त्यांनी दोन्ही मुलींना करिअर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांची मुलं देखील अभ्यासात हुशार होती. ते आपल्या परिस्तिथीची जाणीव ठेवून अभ्यास करत असत.

वेळप्रसंगी मुले चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील यासाठी पैशाची बचत व्हावी म्हणून त्यांच्या वडिलांनी आपली सायकल विकली आणि त्यातून आलेल्या पैशांचा उपयोग त्यांच्या मुलांच्या अभ्यासासाठी केला. तसेच घराच्या दुरुस्तीवर देखील खर्च न करता ते साध्या घरात राहत होते त्या परिस्थितीशी जुळवून घेत राहिले.

हंसराजभाईं यांचे असे ठाम मत होते की, “घराच्या सजावटीवर खर्च करण्यापेक्षा आपण आपले जीवन सजवण्यासाठी शिक्षणावर खर्च केला पाहिजे. घर सुंदर नसले तरी चालेल पण आपले जीवन शिक्षण घेऊन सुंदर बनवले पाहिजे. यामुळे आपोआप घर देखील सुंदर होईल.”

हंसराजभाईंची मोठी मुलगी निरा हिने सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातून एम.डी. आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांच्या धाकट्या मुलीने सुद्धा सरकारी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. ती आता बेंगळूर येथील कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.

हंसराजभाईंचा सगळ्यात लहान मुलगा केऊर याने व्यवस्थापन विषयात शिक्षण घेतले असून तो आता चांगल्या पगारासह नामांकित कंपनीत नोकरी करत आहे. या सगळ्यांत त्यांच्या वडिलांचे श्रेय आहे असे तिन्ही भावंडे सांगतात. त्यांनी दिवसरात्र भट्टीत काम करून आम्हाला शिकवले, असेही ते म्हणतात.

त्यांनी तब्बल 32 वर्ष एकाच कारखान्यात काम केले. अशिक्षित असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित बनवले. यादरम्यान त्यांनी मुलांना अनेक कमतरतांमध्ये जीवन जगण्यास देखील शिकवले होते. परंतु, नशिबाने त्यांची अर्ध्यातच साथ सोडली.

ज्या वडिलांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवले. आता त्या मुलांच्या जीवनात यशाचा सूर्य उगवला आहे. मात्र, त्यांचे वडिल हंसराजभाईं यांची अल्पशा आजाराने जीवनज्योत मा’व’ळ’ली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page