भारतीय सैन्यातील ‘अमर जवान’, असा जवान जो श’ही’द होऊनही सीमेवर करत आहे भारत देशाचे रक्षण!

1962 मध्ये भारत-चीन यांच्यामध्ये झालेल्या यु’द्धा’च्या कथा आजही जिवंत आहेत. या युद्धात भारतीय जवानांनी ज्या प्रकारे धाडस दाखवून शेवट पर्यंत लढा दिला ज्यामुळे भारतीय जवानांचा नेहमीच अभिमान वाटेल.

या यु’द्धा’त असा क्षण आला होता, जेव्हा चीनने अरुणाचल प्रदेश बळकावण्यासाठी तिथल्या सीमेवर ह’ल्ला केला. परंतु, त्या चिनी सैनिकांना माहित नव्हते की, तिथे भारतीय सैन्यातील अशा एका जवानाचा सामना करावा लागणार आहे, जो सगळ्यांसाठी एकटा पुरून उरणारा आहे. तो जवान दुसरा कोणी नसून रायफलमन जसवंतसिंग रावत होते.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सात दशकांहूनही अधिक काळ गेला आहे. यामध्ये अनेक भारतीय जवानांना आपल्या प्राणाची आ’हु’ती द्यावी लागली आहे. परंतु यामध्ये एक श’ही’द जवान म्हणजेच जसवंतसिंग रावत हे श’ही’द झाल्यानंतरही अजरामर झाले आहेत आणि आजही ते आपल्या देशाचे रक्षण करतात असा स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे.

तसेच जसवंत सिंग रावत यांचे मंदिर देखील बांधण्यात आले आहे. प्रत्येक सैनिक येथे दर्शन घेऊनच पुढे जातो, असे म्हटले जाते. श’ही’द जसवंत सिंग रावत यांच्या नावापुढे अजूनही स्वर्गीय लिहिलेले नाही. ते जेव्हा श’ही’द झाले तेव्हा ते भारतीय लष्करात रायफलमॅन होते मात्र, आता पदोन्नती मिळाल्यानंतर ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांना अजूनही भारतीय सैन्याकडून बढती मिळते तसेच घरी जाण्यासाठी रजा देखील मिळते.

जसवंत सिंह रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील बंदियु या गावात झाला. त्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु, त्यांचे वय कमी असल्याने त्यांची निवड झाली नाही. अखेर 19 ऑगस्ट 1960 रोजी वयाच्या 19 व्या वर्षी ते गढवाल रायफल्समध्ये रुजू झाले. त्यांनतर 14 सप्टेंबर 1961 रोजी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि त्यांना अरुणाचल प्रदेशमधील चीन सीमेवर तैनात करण्यात आले होते.

17 नोव्हेंबर 1962 रोजी आपला शेजारील देश चीन याने अरुणाचल प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आपल्यावर आ’क्र’मण केले. तेव्हा नुरानंग येथील पुलाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्याची एक तुकडी तेथे तैनात होती. त्यावेळेस अचानक चिनी सैन्य जोरात आ’क्र’मण करत होते आणि जमीन बळकवणव्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान भारतीय सैन्याने तुकडी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

परंतु, यामध्ये जसवंतसिंग रावत, लान्स नायक त्रिलोकी सिंग नेगी आणि गोपाळ यांनी माघार घेतली नाही. त्यांनी या चिनी सैनिकांशी लढा देण्याचे ठरवले. त्यावेळेस हे तिघेजण वेगवेगळया जागा बघून लपून बसले आणि त्यांनी चिनी सैनिकांवर गो’ळी’बा’र चालू ठेवला तसेच त्यांनी बॉ’म्ब देखील फेकले. यामुळे अनेक चिनी सैनिक ठा’र झाले. मात्र, या यु’द्धा’त त्रिलोकी सिंग आणि गोपाळ श’ही’द झाले.

मात्र, जसवंत यांनी आपला धीर सोडला नाही. त्यांनी या यु’द्धा’त सीमेवर सलग 72 तास लढाई करून एकट्याने 300 चिनी सैनिकांचा खा’त्मा केला. मोठ्या धैर्याने त्यांनी चिनी सैनिकांना चि’रड’ले आणि अरुणाचल प्रदेशला चीनच्या ताब्यात जाण्यापासून रोखले. अखेर चिनी सैनिकांनी त्यांना पकडले आणि त्यांचे शि’र’च्छे’द करण्यात आला.

अजूनही श’ही’द जसवंतसिंग रावत हे श’ही’द झाले नसून आजही आपल्यात जिवंत आहेत. भारताच्या पूर्वेकडील सीमेवर रक्षण करत पहारा देत आहेत असे तेथील स्थानिक लोकांचे ठाम मत आहे. त्या ठिकाणी जसवंतगड असे मोठे स्मारक देखील उभारण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page