या महिला IPS अधिकाऱ्याची 20 वर्षात तब्ब्ल 41 हुन अधिक वेळा झाली बदली, नुसत्या नावाने थरथर कापतात..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. यावरून आपल्याला महिला सक्षमीकरणाचा अंदाज लावता येतो. जिथे पूर्वी स्त्रिया घरातील कामांपुरत्या मर्यादित होत्या, तिथे आज विमान उडवण्यापासून ते शेतीपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या महिला उत्तमरीत्या पार पाडत आहेत. देश आणि समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या अशा अनेक शूर महिला आपल्या देशात आहेत.

पोलीस कर्मचार्‍यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असली तरीही समर्पण आणि निष्ठेमध्ये त्या पुरुषांच्या मागे नाहीत. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. रूपा दिवाकर मोदगील यांचा जन्म कर्नाटकातील दावणगेरे येथे एका सामान्य कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडिल जे.एच. दिवाकर हे एक निवृत्त टेलिकॉम अभियंता आहेत. तसेच आई हेमावती या पोस्ट विभागात नोकरी करत होत्या, त्या सुद्धा निवृत्त झाल्या आहेत.

डी रूपा ह्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. रूपा यांनी कर्नाटकमधील कुवेम्पू विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू विद्यापीठातून मानसशास्त्रात एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. रुपा यांची छोटी बहीण रोहिणी या आयआरएस अधिकारी आहेत.

डी रूपा यांच्या वडिलांचे नेहमीच मुलींनी सरकारी सेवेत रुजू व्हावे असे स्वप्न होते. त्या केवळ आठ वर्षांच्या असल्यापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना आयएएस किंवा आयपीएस अधिकारी म्हणजे काय हे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी पोलिस म्हणजे काय समजावून सांगितले होते. तेव्हा त्यांना काहीच कळत नव्हते पण आयपीएस हा शब्द त्यांच्या मनावर उमटला होता, असे त्या सांगतात.

अशा प्रकारे लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डी रूपा यांनी मेहनत घेतली. लहानपणापासूनच रूपा यांना खाकी वर्दी घालण्याची आवड होती. त्या वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी म्हणजेच 2000 मध्ये त्या कर्नाटकच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया त्यांनी 43 रँक मिळवला.

त्यानंतर रुपा यांनी हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतून प्रशिक्षण घेतले. त्यांनी आयपीएस प्रशिक्षणातील खंडपीठात पाचवे स्थान पटकावले आहे. त्यानंतर त्यांना कर्नाटक केडरमध्ये सामील करण्यात आले. डी रूपा यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात एसपी म्हणून झाली होती. त्यांनतर त्यांनी गदग, बिदर आणि यादगीर जिल्ह्यात एसपी म्हणूनही काम केले.

पुढे 2003 मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी मुनीश मौदगिलसोबत लग्न केले. डी रूपा यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक कठोर पावले उचलली आहेत. नेत्यां बरोबर झालेल्या अनेक छोट्या-मोठ्या च’क’म’कीं’मु’ळे रूपा यांची 18 वर्षांत तब्ब्ल 41 पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. डी रूपा या त्यांच्या राज्यातील गृहसचिव पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला आहेत. त्या आपल्या सर्वांसाठीच एक उत्तम आदर्श आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page