जावयाची करामत! मटण खाण्यासाठी लाडका जावई घरी आला आणि चक्क आपल्या सासूलाच घेऊन पळून गेला..

आपण नेहमीच अनेक प्रेमींचे अनोखे किस्से पाहत असतो. प्रेम हे आंधळे असते असे म्हटले जाते. कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेमात पडलेला व्यक्ती जा’त किंवा धर्म पाहून प्रेमात पडत नाहीत. तसेच काही महाप्रतापी लोक प्रेमात इतके वेडे झालेले असतात की ते कोणत्याही परिणामांचा विचार न करता पळून जाऊन देखील लग्न करतात.

आज आपण असाच काहीसा प्रकार पाहणार आहोत. हा प्रकार राजस्थान येथून समोर आला आहे. यामध्ये सासूरवाडीला मटण खाण्यासाठी गेलेला जावई चक्क आपल्या सासूलाच घेऊन पळून गेला आहे. या घटनेची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यात राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाचे महिन्यापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी तरुणाच्या सासू-सासऱ्यांनी त्यांच्या जावयाला घरी जेवणाचे निमंत्रण देण्याचे ठरवले. त्यांनतर ठरल्याप्रमाणे जावई सासुरवाडीत दाखल झाला.

घरी आल्यानंतर तरुणाने त्याच्या सासऱ्यासोबत दा’रू’ची पार्टी केली. त्यांनतर रात्री जेवणात मटणाचा बेत होता त्यामुळे त्याने त्यावर चांगलाच ताव मारला. पुढे जेवण उरकल्यांनतर सगळे झोपून गेले. याचदरम्यान, सगळे झोपलेले असल्यामुळे आपल्यावर कुणाचे लक्ष नाही हे पाहत जावई चक्क आपल्या सासूला घेऊन घरातून फ’रा’र झाला.

थोड्या वेळाने जेव्हा सासऱ्याला जाग आली तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यांचा जावई घरात कुठेही दिसला नाही. त्यांनतर त्यांनी पाहिले की त्यांची बायको देखील घरात कुठेही दिसत नाहीये. त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली पण ते दोघेही दिसले नाही. बायको जावयासोबत घरातून फ’रा’र झाल्याचे पाहून सासऱ्याला जोरात धक्काच बसला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत त’क्रा’र नोंदवली.

सासू जावायासोबत फ”रा’र झाल्याच्या घटनेने संपुर्ण परिसरात मोठी खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासूचे आपल्या मुलीच्या लग्नाच्या आधीपासूनच या तरुणासोबत अ’फे’अ’र होते. त्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्या दोघांनाही लग्न करायचे होते म्हणून सासूने एक प्लॅन आखला.

यासाठी सासूने चक्क स्वतःच्या मुलीचे लग्न तरुणासोबत लावून दिले. त्यांनतर पुढे लग्नाच्या अवघ्या महिनाभरानंतरच दोघांनीही पळून जाण्याचे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे ते दोघेही घरातून पसार झाले. या घटनेचा अधिक तपास होत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पोलिसांनी जावयावर गु’न्हा दाखल केला आहे. या घटनेची सो’श’ल मी’डि’या’व’र सध्या चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page