काळ्याकुट्ट म्हशीने दिला पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म, नागरिकांनी पाहण्यासाठी केली तुफान गर्दी..

अनेकदा अशा काही घटना घडतात की ज्या आपल्याला चकित करून टाकतात. आपण म्हशीने जन्म दिलेल्या रेडका विषयी अनेक अनोखे किस्से ऐकले असतील. परंतु, आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

सोलापूर जिल्ह्यातील ही एक चकित करणारी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका म्हशीने जन्म दिलेल्या अनोख्या रेडकाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची खूप गर्दी जमा झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील वडवळ या गावात एका काळ्या म्हशीने चक्क एका पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे. साधारणतः आपण पाहिले आहे की काळ्या म्हशीचे रेडकू हे त्याच रंगाचे म्हणजेच काळे असते. परंतु, वडवळ येथील या काळ्याकुट्ट म्हशीने काळ्या नाही तर चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.

आपण अंगावर किंवा डोक्यावर एखाद-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू पाहिले असेल. मात्र, एखाद्या गाईच्या वासराप्रमाणेच पांढरे शुभ्र रेडकू क्वचितच पाहायला मिळते. वडवळ या गावचे रहिवासी असलेले राजकुमार कोटीवाले हे शेतकरी आहेत आणि त्यांचा पशुपालनाचा देखील व्यवसाय आहे. त्यांच्या गोठ्यातील म्हशीने अशा आगळ्यावेगळ्या रेडकाला जन्म दिला आहे.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच त्या रेडकाला पाहण्यासाठी लोकांची त्या ठिकाणी एकच गर्दी जमा झाली आहे. सध्या परीसरात या पांढऱ्या शुभ्र रेडकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, त्यांच्यातील ज’णु’कां’च्या मिश्रणामुळे रेडकाच्या रंगावर परिणाम झाला आहे. म्हैस आणि रेडकू या दोघांची प्रकृती देखील उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

एका काळ्याकुट्ट म्हशीचे रेडकू पूर्ण पांढरे शुभ्र असल्याची घटना दुर्मिळच आहे. त्यामुळे या अनोख्या रेडकाची परिसरात तुफान चर्चा सुरू आहे. तसेच सो’श’ल मी’डि’या’व’र देखील ही घटना चांगलीच धुमाकुळ घालत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page