खड्डे चुकवण्याच्या नादात झाला घा’त, खाली पडलेल्या दाम्पत्याला डम्परने चिरडले, क्षणात झाले कुटुंब उध्वस्त..

बोरिवली नॅशनल पार्क येथील असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळेच गुरुवारी दुपारी दीड-दोनच्या दरम्यान एक दु’र्दै’वी घटना घडली. बोरिवलीहून दुचाकीने दहिसरच्या दिशेनं जात असताना एका खड्ड्यात पडून नाझिर आणि त्यांची पत्नी छाया हे रस्त्यावर पडले.

घटनास्थळी रस्त्यावर बरेच खड्डे असल्याने ते खड्डे चुकविण्याचा डम्परने प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नातच शाह दाम्पत्य डम्परच्या चा’का’खा’ली आल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी उपस्थितांनकडून ही माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दु’र्घ’ट’ने’त मात्र त्या दोघांचाही दु’र्दै’वी मृ’त्यू झाला.

नासिर शाह आणि छाया शाह हे नायगाव येथे शुटिंगसाठी निघाले होते. नासिर शाह हे टीव्हीवरील रिॲलिटी शोमध्ये क्रिएटिव्ही विभागात काम करत होते. तर छाया शाह या मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होत्या. दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे.

पोलिसांनी शाह दाम्पत्य यांच्या दुचाकीला ध’ड’क देणाऱ्या डम्पर चालक सलीम शेख याला ताब्यात घेतले आहे. कोणाच्या चुकीमुळे हा अ’प’घा’त घडला असेल हे सर्व चौकशी केल्यानंतर समजेल असे पोलिसांनी सांगितले आहे. या अ’प’घा’ता’ला पूर्णपणे रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप तेथील स्थानिक लोकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page