वडीलांच्या ट्रंकमध्ये सापडले 60 वर्षांपूर्वीचे पासबुक, रक्कम पाहून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली, मिळाले तब्बल..

आपण जुन्या काळातील म्हणजेच आपल्या आईवडिलांच्या, आजी-आजोबांच्या काळातील सगळ्या वस्तू निरपोयोगी म्हणून टाकून देत असतो. त्यांचे जुने कागदपत्र, फाईल्सचा काही उपयोग नाही म्हणून फेकून देतो. परंतु कधी कधी त्यांनी जपून ठेवलेल्या अनमोल वस्तू तसेच आठवणी आपल्याला थक्क करून टाकतात. अशीच एक घटना घडलेली आहे ज्यामुळे एक मुलगा चक्क करोडपती बनला आहे..

त्या मुलाला त्याच्या वडिलांचे 60 वर्षांपूर्वीचे पासबुक सापडले आणि तो श्रीमंत बनला. अमेरिकेतील चिलीमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्सेल हिनोजोसाच्या वडिलांनी 1960 आणि 1970 च्या कालावधीत घर घेण्यासाठी पैसे जमा केले होते. त्यांनी $163 डॉलर साठवले होते. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 12684 रुपये होते.

हिनोजोसाच्या वडिलांनी ती सर्व रक्कम क्रेडिट युनियन बँकेत ठेवली होती. ही बँक आता बंद पडली आहे. वडीलांच्या मृ’त्य’नं’त’र त्याने ते बँकेचे पासबुक एका ट्रंक मध्ये ठेवून दिले होते. एके दिवशी काहीतरी शोधत असताना हिनोजोसाचे लक्ष त्या ट्रंकवर गेले. तिथे त्याला ते पासबुक दिसले.

पासबुक पाहिले तर त्याला थोडी रक्कम दिसली. ती पाहून ही रक्कम काही कामाची नाही असे म्हणून त्याने ते पासबुक परत बंद केले. बंद करत असताना त्याने त्यावर स्टेट गॅरंटी असे शब्द पाहिले. ते पाहिल्यानंतर त्याने सगळे नीट तपासले आणि हिशोब करण्यास सुरुवात केली.

60 वर्षांपूर्वीच्या ह्या पैशांची किंमत आता ह्या महागाईच्या काळात किती वाढली असेल? असा तो विचार करू लागला आणि हिशोब करू लागला. ही रक्कम आता 1.2 दशलक्ष डॉलर्स एवढी झाली असावी असा त्याने अंदाज लावला.

हीनोजोस हे सगळे प्रकरण न्यायालयात घेवून गेला तेथे त्याला त्याच्या वडिलांचे साठ वर्षांपूर्वीचे असलेले पासबुक सादर करण्यास सांगितले. भारतीय रुपया नुसार ही रक्कम 9.33 कोटी रुपये एवढी होती. त्यानंतर त्याने ही रक्कम त्या राज्य सरकारकडून मिळण्याचा दावा केला.

ही बाब राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नेली. तिथे ही निकाल हिनोजोसाच्या बाजूनेच लागला. बँक पासबुक बाबतचा अंतिम निर्णय आता न्यायालय ठरवेल, असे राज्य सरकारने सांगितले आहे. अंतिम निर्णय हिनोजासाच्या बाजूने लागल्यानंतर त्याला जवळपास 10 कोटी रुपये मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page