भगवत गीता पाठांतर परिक्षेत सात वर्षीय व्योमने पटकावला पहिला क्रमांक, भगवत गीतेचे 18 अध्याय आहेत तोंडपाठ..

अवघ्या सात वर्षाच्या व्योमचे भगवत गीतेचे 18 अध्याय अगदी तोंडपाठ आहेत. कर्नाटक मधील श्रूंगेरी येथे शारदा पिठातील भगवद्गीता पाठांतर परीक्षेत त्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. शंकराचार्यांच्या हस्ते त्याचा एकवीस हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.

डोंबिवली मधील खंबाळपाडा येथील अबोली स्टेट या सोसायटीत व्योम राहत असून, तो त्याचा आई-वडिल आणि आजी-आजोबांसोबत राहतो. व्योम हा सिस्टर निवेदिता या इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याच्या आजीने त्याला ही भगवत गीता शिकवली.

कल्याणच्या श्री गुरु कूलूम न्यास या संस्थेतून आजींनी 2019 मध्ये कर्नाटकामधील श्रूंगेरी येथील शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवत गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले होते. आपली आजी श्लोक म्हणत असल्याचे व्योमलाही कुतूहल वाटायचे.

त्यांनतर त्याने आजीकडे श्लोक शिकण्यासाठी हट्ट धरला. आजीचे श्लोक पठण ऐकून त्याला वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी संपुर्ण श्लोक उच्चारासह पाठ झाले होते. त्याने ते श्लोक बोलून दाखवल्यामुळे आजींनी व्योमला श्लोक शिकवण्याचा निश्चय केला.

आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवून व्योमनेदेखील गीता पठणाला एक वर्षापूर्वीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अवघ्या वर्षभरातच गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय तोंडपाठ केले. या अध्यायांमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत.

इतक्या लहान मुलाचे संपूर्ण अध्याय पाठ असल्याचे पाहून सगळ्यांना नवल वाटले. त्याच्या या कामिगरीचे तेथील श्री जगद्गुरु शंकराचार्य यांनी त्याचे कौतुक करून त्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. व्योमच्या यशात सगळ्य़ांचे श्रेय आहे. घरच्यांची साथ आणि देवाची कृपा आहे त्यामुळे हे शक्य झाले, असे त्याच्या आज्जी म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page