याला म्हणतात प्रामाणिकपणा! कोल्हापूरच्या या दाम्पत्याने 10 तोळ्यांचे हरवलेले सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत केले..

आजकाल प्रामाणिकपणा ही गोष्ट माणूस विसरत चालला आहे. साधे रस्त्यावर 10 रुपयांची नोट जरी दिसली तरी माणूस आपली म्हणून ती खिशात ठेवतो. पण असेही काही लोक आहेत जे प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे याची उदाहरणे देतात. नुकतेच असे एक उदाहरण कोल्हापुरात पाहायला मिळाले आहे.

कोल्हापुरातील रहिवासी असलेले तानाजी देसाई हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी बँकेकडून काही कर्ज घेतले होते आणि त्याचे काही हफ्ते थकल्याने ते चिंतीत होते. शेवटी त्यांनी घरातील 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने बँकेत ग’हा’ण ठेवून त्यावर कर्ज काढण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी यासाठी काही कागदपत्रे सोबत घेतली आणि एका रुमालात दागिने ठेवून ते त्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. यानंतर बँकेच्या दिशेने घाईगडबडीत जात असताना त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील सामान एमएसईबी रोडवर पडले.

यानंतर त्या रोडवरून जात असताना विशाल मोरे या तरुणाला एक रुमाल बे’वा’र’स स्थितीत आढळून आला. त्यांनी हा रुमाल हातात घेऊन पाहिले तर त्यात दोन सोन्याचे हार, दोन गंठण, ब्रेसलेट असे एकूण 10 तोळे सोने होते. विशाल यांनी ही गोष्ट त्यांच्या पत्नीला देखील सांगितली आणि त्या देखील त्या ठिकाणी आल्या.

दागिन्यांसोबत असलेल्या कागदपत्रांवरून त्यांनी तानाजी देसाई यांना संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला आणि पण तानाजी यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हे नवरा-बायको करवीर पोलीस स्टेशनमध्ये गेले.

त्यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली आणि यावर पोलिसांनी देखील या दाम्पत्याचे कौतुक केले. दागिने हरवल्याने तानाजी देसाई पोलिसांकडे आलेच होते आणि त्यांचे दागिने सापडल्याचे कळताच त्यांच्या जिवात जीव आला. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page