चुकीच्या डिटेल्समुळे तरुणाच्या अकाउंटमध्ये जमा झाले तब्बल सहा कोटी रूपये ! सगळे पैसे चैनीवर उधळले, मात्र नंतर पडले महागात..

आजकाल बहुतांश लोक आपले आर्थिक व्यवहार ऑ’न’ला’इ’न करताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑ’न’ला’इ’न व्यवहारामुळे आजकाल सा’य’ब’र गु’न्हे’गा’री’चे प्रमाण अधिक वाढले आहे. तसेच आपल्या थोड्याशा चुकीमुळे चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. नुकतीच एक घटना ऑस्ट्रेलियामधून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी अचानक ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षांच्या अब्देल घडिया या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये तब्बल 6 कोटी रुपये 14 लाख रुपये जमा झाले होते. एवढी रक्कम पाहून अब्देलच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

वास्तव्यात एक कपल घर खरेदी करत होते. त्यावेळेस शेवटच्या टप्प्याचे पैसे द्यायचे होते. त्यामुळे ते पैसे ट्रान्सफर करत असताना चुकून 6 कोटी 14 लाख रुपये अब्देल घडिया याच्या अकाउंट वर ट्रान्सफर झाले. बॅंक डिटेल्स चुकीचे भरले गेल्यामुळे एवढे पैसे थेट अब्देलच्या अकाउंट मध्ये जमा झाले होते.

परंतु, अब्देल याने ही बाब लक्षात येऊन सुद्धा त्याने एवढे कोट्यवधी रुपये आपल्या चैनीवर खर्च करण्यास सुरुवात केली. त्याने वेगवेगळ्या ठिकानांहून 5 कोटी रुपये खर्च करून सोने खरेदी केले. तसेच 90 हजार रूपयांची शॉपिंग केली. त्याने स्वतःसाठी महागडे कपडे, मेकअपचे साहित्य खरेदी केले. तसेच लक्झरी पार्ट्यांमध्ये जाऊन मनसोक्त पैसे उडवले. उरलेले पैसे एटीएम मधून काढून आणून इतर बाबींवर खर्च केले.

मात्र, जेव्हा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अब्देलचा तपास घेतला आणि त्याला अ’ट’क केले. त्याच्यावर फ’स’व’णू’क केल्याचा गु’न्हा दाखल केला असून त्याला डिसेंबरमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अशा प्रकारे ऑ’न’ला’इ’न व्यवहार करत असताना आपण प्रत्येकाने सावधानता बाळगली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page