श’ही’द मुलाचे अजूनही अशा प्रकारे करते लाड, पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील..

“आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही”, असे म्हटले जाते. आई ही देवाने निर्माण केलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. देवाला सगळ्या ठिकाणी जात येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली असे म्हणतात. आई एवढे प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. आज आपण अशाच एका आईच्या आपल्या मुलावर असलेल्या प्रेमाची खरी कहाणी जाणून घेणार आहोत.

छत्तीसगड येथील जशपुरमधील परवरा गावचे श’ही’द बसील टोप्पो हे वस्तान जिल्ह्यात पोलिस म्हणून तैनात होते. त्यांची पोस्टिंग भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. परंतु, 2011 मध्ये झालेल्या न’क्ष’ल’वा’दी ह’ल्ल्या’त ते श’ही’द झाले.

आपला मुलगा श’ही’द झाला ही बातमी जेव्हा त्यांच्या आईला समजली तेव्हा त्यांची प्रकृती रडून रडून खूप खराब झाली होती. त्यांना त्यांच्या मुलाचे खूप लाड करण्याची इच्छा होती. मात्र, एवढ्या लवकर मुलगा आपल्याला सोडून गेला ह्या विचाराने त्या मानसिकरित्या कमजोर झाल्या होत्या. मुलाचे अचानक जाणे त्यांना सहन होत नव्हते.

त्यांनतर त्यांनी आपल्या मुलाच्या अं’ती’म सं’स्का’रा’नं’त’र आपल्या पतीला मुलाचा एक पुतळा बनवण्यास सांगितले. यावर पत्नीची परिस्थिती पाहून पतीने ओरिसाच्या कलाकारांकडून आपल्या श’ही’द मुलाचा एक पुतळा बनवून त्याचे स्मारक उभारले आहे.

या श’ही’द बसीलची आई दररोज सकाळ-संध्याकाळ एका मुलाप्रमाणे त्या मूर्तीचे लाड करत असते. जिथे मुलाचे स्मारक उभारले आहे तिथे जाऊन ती तासनतास बसून आपल्या मुलाशी बोलत असते. तेथून जाणारे जे कोणी हे दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.

त्या आईला देखील माहित आहे की आपला मुलगा आता कधीही परत येणार नाही. मात्र, तरीही ती त्याच्याशी मनातून संवाद साधत असते. आता मागील 11 वर्षांपासून ही आई रोज आपल्या मुलावर जिवंत असल्यासारखे प्रेम करते आणि त्याचे लाड करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page