साई बाबांच्या चरणी कुटुंबासोबत पोहचली शिल्पा शेट्टी, दर्शन घेताच म्हणाली “साई बाबा नेहेमीच मला..

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबासह साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी रविवारी शिर्डीत पोहोचली होती. यावेळी दर्शनासाठी शिल्पासोबत तिचा पती राज कुंद्रा, मुलगी, तिची आई आणि बहिण देखील होती. मंदिरात धार्मिक विधी पार पाडल्यानंतर शिल्पाने बाहेर मी’डि’याशी बोलताना सांगितले की ती जवळपास दरवर्षी मंदिरात येते.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दर्शन घेतानाचा एक फोटो शेअर केला. “त्याच्यावर अखंड विश्वास. ओम साई राम. श्रद्धा और सबूरी,” असे तिने पोस्टला कॅप्शन दिले आहे.

ती म्हणाली, “साई बाबा मला नेहमीच योग्य मार्ग दाखवतात, आनंदी आणि कठीण काळात माझ्यासोबत असतात.” ती पुढे म्हणाली, “माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि याचमुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मी इथे येते.”

या वर्षी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारले असता, शिल्पाने खुलासा केला की तिने रोहित शेट्टीच्या अॅक्शन-पॅक वेब सीरिज इंडियन पोलीस फोर्स आणि तिच्या आगामी चित्रपट सुखीचे शूटिंग पूर्ण केले आहे.

या वर्षी आणखी एक चित्रपट करणार असल्याचेही तिने सांगितले. मात्र, तिने या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली नाही. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय यांच्यासमवेत रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिज इंडियन पोलीस फोर्स मधून ती तिचे भव्य OTT पदार्पण करणार आहे.

ही मालिका देशभरातील पोलीस कर्मचार्‍यांच्या निःस्वार्थ सेवा, बिनशर्त वचनबद्धता आणि प्रखर देशभक्तीचे प्रतीक आहे. शिल्पा अखेरची अॅक्शन कॉमेडी फिल्म निकम्मा मध्ये अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्यासोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page