महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या बाळाला कडेवर घेऊन भाषण केल्यामुळे अनेकांनी केली टी’का, मात्र पतीने दिले हे सडेतोड उत्तर..

सध्या गेल्या काही दिवसांपासून एका महिला आयएएस अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्या एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या लहान बाळाला घेऊन भाषण देत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर टी’का केली जात आहे.

केरळच्या पथनामथिट्टाच्या जिल्हाधिकारी दिव्या अय्यर ह्या एका खासगी चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाला आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन गेल्या होत्या. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषण केले.

30 ऑक्टोबरला या चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांपैकी एक असलेले तसेच राज्य विधानसभेचे उपसभापती चिट्टायम गोपकुमार यांनी आपल्या फे’स’बु’क अकाउंटवर या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर या व्हिडिओमध्ये दिव्या अय्यर या आपल्या मुलाला घेऊन भाषण करत होत्या. त्यामुळे सो’श’ल मी’डि’या’व’र याची चांगलीच चर्चा रंगली होती.

दिव्या अय्यर यांच्या काही समीक्षकांचे म्हणणे आहे की बाळाला असे सोबत घेऊन भाषण करणे योग्य नाही, त्यामुळे त्यांची ही कृती अनेकांना आवडली नाही. तर काहींनी त्यांचे समर्थन देखील केले आहे. परंतु, असा वाद निर्माण झाल्यानंतर चिट्टायम गोपकुमार यांनी हा व्हिडीओ लगेचच डिलीट करून टाकला.

सो’श’ल मी’डि’या’व’र मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टी’का करण्यात आली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, दिव्या अय्यर या एक उच्च अधिकारी आहेत आणि त्यांना हे असे वर्तन शोभत नाही. असे असले तरीही अनेक लोक दिव्या अय्यर यांचे समर्थन करत म्हटले की, महिला आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या भूमिका बजावत असतात. तसेच प्रत्येक आईला आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

काही लोकांनी दिव्या अय्यर यांचे समर्थन करत त्यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांचे उदाहरण दिले आहे. जॅसिंडा आर्डर्न यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला आपल्या सोबत आणले होते. तसेच यूएन शांतता परिषदेत त्यांनी आपल्या चिमुकलीला कडेवर घेऊन भाषण दिले होते. तेव्हा ही घटना संपूर्ण जगभरात तुफान व्हायरल झाली होती. अनेकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देखील दिला होता.

यादरम्यान आपल्या पत्नीवर टी’का होत असल्याने दिव्या अय्यर यांचे पती माजी आमदार केएस सबरीनाधन यांनी आपल्या पत्नीला पाठिंबा देत त्यांचा बचाव केला आहे. त्यांनी फे’स’बु’क’व’र पोस्ट करत आपल्या पत्नीवर टी’का करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत म्हंटले आहे की, “दिव्या या एक वचनबद्ध अधिकारी आहेत. त्या इतर दिवशी आपल्या अधिकृत कामांसाठी पूर्णपणे समर्पित होऊन काम करत असतात.

मात्र, हा त्यांच्या सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या दिवशी त्या प्रवास तसेच इतर कार्यक्रम टाळून आपल्या मुलासमवेत वेळ घालवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. परंतु, काही कार्यक्रम टाळता येऊ न शकल्याने त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. मात्र, आपल्या सोबत मुलगा ही असेल याची कल्पना त्या आधीच सबंधित आयोजकांना देतात. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी देखील त्यांनी आयोजकांना आधीच माहिती दिली होती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page