मुलगी पाहण्यासाठी मुलगा सोलापुरला पोहचला, दोघांची पसंती देखील झाली, लग्न होणार तितक्यात..

लग्नाचे अनेक अनोखे किस्से नेहमी व्हायरल होत असतात. आज आपण अशीच एक कहाणी जाणार घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील जळकेवाडी येथे राहणारे बापूसाहेब रमेश मोरे यांच्यासाठी त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी स्थळ बघत होते.

बापूसाहेब यांचा छोटा भाऊ बाळासाहेब रमेश मोरे हे देखील आपल्या मोठ्या भावासाठी मुलगी शोधत होते. यादरम्यान बाळासाहेब यांनी 3 नोव्हेंबर रोजी निलेश यादव यांना दत्तात्रेय दळवी यांच्याकडे स्थळ शोधण्यास सांगितले होते. यावर दळवी यांनी गोरे वस्ती, पुणे येथे राहत असलेल्या वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष शामल चव्हाण यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

यानंतर मोरे कुटुंबियांनी शामल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोलापूर मध्ये एक मुलगी आहे असे सांगितले. परंतु, त्यांनी मुलगी पाहण्यासाठी सोलापूरला जावे लागेल असे सांगितले. तसेच लग्नासाठी दीड लाख खर्च होईल असे ही सांगण्यात आले.

पुढे शामल चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे मोरे कुटुंबीय सोलापूर मधील टेंभुर्णी येथे गेले. त्यांनतर जत येथील रहिवासी असलेले मुबारक मोहम्मद मुल्ला यांच्याशी मोरे कुटुंबियांची भेट घालून दिली. यांच्या समवेत धानम्मा बिराजदार या महिला देखील होत्या. हे दोघे मोरे कुटुंबीयांना जुने घरकुल येथे असलेल्या एका पत्र्याच्या घरात घेऊन गेले.

तिथे पोहचल्यानंतर त्या दोघांनी सुरेखा पुजारी या मुलीला दाखवले. मुलीचे आईवडिल या जगात नसल्याचे त्यांनी सांगितले आणि आता रात्र झाली असून लग्नाचा कार्यक्रम आपण उद्या करून घेऊ असे सांगितले. तोपर्यंत आपण लग्नासाठी लागणारे कागदपत्र तयार करून घेऊ असे ही ते म्हणाले.

यानंतर त्यांनी कागदपत्र तयार करायचे आहेत असे सांगून सुरुवातीला मोबाईलवरून 10 हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्वांना लग्नाची नोंद करण्यासाठी जिल्हा परिषद समोर येण्यास सांगितले. त्यावेळेस बॉ’ण्ड लिहून घेताना मुल्ला यांनी मोरे यांना धानम्मा बिराजदार यांच्या अकाउंटवर 1 लाख 10 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. मोरे यांनी आधीच ठरल्याप्रमाणे त्यांना तेवढी रक्कम पाठवली.

यानंतर धानम्मा बिराजदार यांनी आपल्या खात्यातून 50 हजार रुपये निलेश यांना पाठवले आणि शामल चव्हाण यांच्या खात्यावर 15 हजार रुपये पाठवले. तसेच धानम्मा बिराजदार यांनी स्वतः जवळ 60 हजार रुपये रक्कम ठेवली.

मात्र, मोरे कुटुंबीयांसमोर धानम्मा बिराजदार यांनी मला पैसे मिळाले नाहीत असे खो’टे सांगून तिथून पळ काढला. यानंतर मुल्ला आणि शामल चव्हाण या दोघांनी मोरे कुटुंबीयांना मुलगी सुरेखा आणि बहीण महानंदा या दोघींना घेऊन पुणे नाका येथे या, आपण तिथे मंदिरात तुमचे लग्न लावून देऊ असे सांगितले.

यावर मोरे कुटुंबियांनी होकार दिला आणि ते सांगितल्याप्रमाणे तेथे पोहचले. तिथे गेल्यानंतर तिथे मुल्ला आणि शामल चव्हाण नसून तिथे अनोळखी लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. मोरे कुटुंबीय विचारपूस करत होते. याच गोंधळाचा फायदा घेत मुलगी सुरेखा आणि तिची बहीण महानंदा या दोघी ही तेथून पळून गेल्या.

यानंतर त्यांनी सगळ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे मोबाईल बंद लागले. त्यावेळेस आपली फ’स’व’णू’क झाल्याचे मोरे कुटुंबियांच्या लक्षात आले. यामुळे लगेचच त्यांनी पोलिसांत या सबंधित त’क्रा’र दाखल केली.

मोरे कुटुंबियांनी केलेल्या त’क्रा’री’नंतर पोलिसांनी मुबारक मोहम्मद मुल्ला, धानम्मा बिराजदार, शामल चव्हाण, सुरेखा पुजारी आणि महानंदा यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फ’स’व’णु’की’चा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संबंधित पोलिस अधिक तपास करत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page