तरुणीचे घरातील नोकरावर जडले प्रेम, मुलीची निवड पाहून वडील म्हणाले..

कधी कोण कोणाच्या आणि कसे प्रेमात पडेल याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय देणारी घटना आज आपण पाहणार आहोत. त्यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. एनी एक शिक्षिका आहे. एका यूट्यूब व्हिडिओमध्ये एनीने सांगितले आहे की, तिच्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली होती.

पण ज्या मुलाशी तिचे लग्न ठरवायचे चालले होते तो मुलगा तिला खूप लालची वाटला. त्या मुलाला त्यांची मालमत्ता ह’ड’प करायची होती, असे तिने सांगितले. यासंबंधीत तिने घरच्यांना देखील समजावून सांगितले.

एनीने तिच्या पालकांना सांगितले की, ‘मला पैशाच्या प्रेमात असलेल्या मुलासोबत नव्हे तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलासोबतच लग्न करायचे आहे.’ पुढे एनीने सांगितले की, इशाया नावाच्या मुलाला तिच्या वडिलांनी घरात नोकर म्हणून नोकरीवर ठेवले होते.

त्यांनतर हळुहळु त्यांच्यात संवाद सुरु झाला. ती जेव्हा रविवारी स्वयंपाक करायची तेव्हा इशाया तिला जेवण बनवण्यात मदत करायचा. त्यामुळे एनीला इशायाचा स्वभाव हळुहळू आवडू लागला होता आणि ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने इशायाला आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एके दिवशी रविवारी इशायाला प्रेमाची कबुली दिली.

एनीचे हे बोलणे ऐकून इशायाला सुरुवातीला आश्चर्याचा धक्काच बसला. या घराची तू मालकीण आहेस आणि मी एक छोटा नोकर आहे. हे सगळे कसे शक्य आहे. यावर एनीने मला तू आवडतोस आणि मला तुझाशीच लग्न करायचे आहे असे सांगितले. यानंतर इशायाने विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला आणि अखेर दोन दिवसांनी इशायाने एनीला होकार दिला.

परंतु, याबाबत आईवडिलांना कसे समजावून सांगायचे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिला सुरुवातीला घरच्यांशी बोलायला भीती वाटत होती. मात्र, तिने हिम्मत करून घरी इशायावर प्रेम असल्याचे सांगितले त्यावर तिच्या वडिलांनी तिला होकार दिला. “तो संपत्ती पाहून लग्न करणारा मुलगा नाही. तो कष्ट करून काम करत असतो. त्यामुळे तुझी निवड मला आवडली आहे. तुम्ही एकमेकांसोबत खुश असाल तर सर्व ठीक आहे.” असे एनीचे वडील म्हणाले.

जेव्हा हा सगळा प्रकार इशायाला समजला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. परंतु घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला होकार आहे हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. यानंतर दोघे ही लग्नबंधनात अडकले. एनी म्हणाली की, लग्न करताना श्रीमंती किंवा गरिबी पाहून लग्न न करता, समोरची व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते आणि तुम्हाला किती समजून घेऊन तुमचा आदर करते हे महत्वाचे आहे. सध्या या दोघांची ही अनोखी प्रेमकहाणी सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलीच व्हायरल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page