सँडविच खाताना पॅकेटमध्ये महिलेला आढळून आले तब्बल 34 लाख रुपये, मग केले असे काही की..

अंतरराष्ट्रीय: कधी कोणाचे आयुष्य कसे पालटेल हे काही सांगता येणार नाही. अशीच एक चकित करणारी घटना एका महिलेसोबत घडली आहे. अमेरिकेमधील जॉर्जिया मध्ये राहत असलेले जोआन ओलिवर या बाहेर गेल्या होत्या. तेव्हा त्यांना रस्त्यात भूक लागली म्हणून त्यांनी केफसीच्या ड्राईव्ह थ्रू मधून सँडविच ऑर्डर केले.

ऑर्डर येइपर्यंत त्या बाजूला उभ्या होत्या. ऑर्डर आल्यानंतर त्यांनी सँडविचचे पॅकेट उघडले. पॅकेट उघडुन जोआन यांनी पाहिले आणि त्या चकितच झाल्या. जोआन यांनी ऑर्डर केलेल्या सँडविचच्या पॅकेट मध्ये तब्बल 43 हजार डॉलर्स होते. एवढे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. केफसीच्या काउंटरवरून चूकून इतके पैसे त्यांच्या पॅकेट मध्ये आले असतील असे त्यांना वाटले.

एवढे पैसे पाहून कोणाला आनंद होणार नाही आणि एवढे पैसे कोणाला परत करावेसे वाटतील? उलट हे पैसे परत न करता स्वतःकडेच ठेवून घ्यावेत असे अनेकांना वाटेल. परंतु, जोआन यांनी इमानदारीने हे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे पैसे मोजले असता ते 43 हजार डॉलर्स एवढे होते.

त्यांनी हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून त्यांनी केफसीला ते सगळे पैसे परत केले. जोआन यांच्या या इमानदारीमुळे तेथील मॅनेजरची नोकरी वाचली. जोआन यांच्या या कामगिरीमुळे सध्या सो’श’ल मी’डि’या’वर देखील त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page