तरुणाने चक्क 23 वर्ष लोकल ट्रेनने मोफत प्रवास केला, पण ‘या’ एका चुकीमुळे पितळ उघडं पडलं..

लोकल ट्रेनने प्रवास करत असताना काहीजण अनेकदा गडबडीत ट्रेन चुकेल किंवा कधी कधी लक्षात नाही म्हणून तिकिट काढयला विसरतात. परंतु जेव्हा टीसी ने तिकिट तपासणी करताना पकडले की काहींना त्याचा दं’ड भरावा लागतो तर काहीजण खोटे कारण सांगत असतात. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील एका नागरिकाने तब्बल 23 वर्षे तिकिट न काढता लोकल ट्रेनचा मोफत प्रवास केला आहे असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेमधील तिकीट तपासणी करणाऱ्या पथकाने ही गोष्ट उघडकीस आणली आहे. तिकिट न काढता प्रवास करणाऱ्या अतरंगी प्रवाशांना रोखण्यासाठी प्रत्येक रेल्वस्थानकावर तिकिट तपासणी करणारे पथक असते.

चर्चगेट येथे तिकिट तपासणी करण्यादरम्यान टीसीने रेल्वे प्रवासी अमित कुमार पटेल याच्याकडे तिकिटाची तपासणी केली असता अमित कुमारने रेल्वे मधील कर्मचारी असल्याचे खोटे कारण सांगितले. याबाबत टीसीला संशय आला म्हणून टीसीने अमित कुमार या प्रवाशाकडे ओळखपत्राची मागणी केली.

तेव्हा त्याने 2000 मध्ये बनवलेले जुने ओळखपत्र दाखवले. या ओळखपत्राची अवस्था पाहून त्यांना अमित कुमारवर अजून दाट संशय आला. म्हणून त्याला ग्रेड पे बाबत चौकशी केली असता त्याची बोलती बंद झाली. यानंतर टीसींनी अनेक प्रश्न विचारले, परंतु त्याला त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. तो पूर्णपणे त्यांच्या कचाट्यात सापडला होता.

अखेर त्याने वैतागून टीसींना खरे कारण सांगून टाकले की, तो रेल्वे कर्मचारी नसून एक कंत्राटदार आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे असलेला पास हा गुजरातमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याचा आहे आणि त्याने या पासच्या माध्यमातून या पास सारखा दुसरा एक बनावट पास तयार करून घेतला होता, असे रेल्वे पोलिसांना तपासादरम्यान स्पष्ट केले आहे.

अमित कुमार पटेल याने फक्त लोकल ट्रेननेच मोफत प्रवास केला नाही तर त्याने अनेकदा मेल मधून देखील फुकट प्रवास केला आहे, असे चौकशीदरम्यान त्याने सांगितले आहे. तेव्हा ही त्याने तिकिट तपासणी करताना आल्यानंतर मी रेल्वे कर्मचारी असल्याचे खोटे कारण सांगितले होते. आता रेल्वे पोलिसांनी अमित कुमारवर गु’न्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page