महाराष्ट्राची लेक गाजवतेय केरळमध्ये नाव, वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी झाली IPS अधिकारी..

कोणतेही संकट किंवा अडचणी येऊ द्या, परंतु आपण त्या अडचणींवर मात करुन विजय मिळवणारच असा विश्वास काही प्रेरणादायी लोकांकडून बघून आपल्याला मिळत असतो. आज आपण अशाच एका प्रेरणादायी महिला अधिकाऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. ऐश्वर्या डोंगरे या मुंबईच्या असून त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात दुहेरी पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांनी एक वर्षाचा गॅप देखील घेतला. ऐश्वर्या डोंगरे यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. UPSC पारिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या भारतीय पोलीस सेवेत रूजू झाल्या. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी सेवेत रुजू होऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे.

ऐश्वर्या सध्या केरळ राज्यात त्रिशूर ग्रामीण भागातील पोलीस अधीक्षक म्हणून काम करत आहेत. खूप कमी वेळेत ऐश्वर्या या केरळमध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे चर्चेत आहेत. 2020 मध्ये आयपीएस ऐश्वर्या डोंगरे या केरळमध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तेव्हा त्यांनी कठीण काळात देखील महत्वाची भूमिका बजावत आपले कर्तव्य पार पाडले आहे.

ऐश्वर्या यांना प्रशासनाचा भाग होण्याचे स्वप्न होते. त्यांनी हे स्वप्न अवघ्या 22 व्या वर्षात पूर्ण केले. त्यामुळे त्या नहेमी सो’श’ल मी’डि’या’वर चर्चेत असतात. त्या अनेक तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page