या म्हशीची किंमत आहे तब्बल 10 कोटी रुपये, रोजच्या आहाराचा खर्च सुमारे 10 हजार रुपये, तर मालक दरमहा करतो 12 लाख रुपयांची कमाई

मध्य प्रदेश येथील मुरैना जिल्ह्यात शुक्रवारी किसान मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी तीन दिवसांच्या असलेल्या या किसान मेळ्यातील एक म्हैस ही सर्वात मोठे आकर्षण ठरली आहे. या म्हैशीची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ही म्हैस तब्बल 10 कोटी रुपयांची आहे आणि ही म्हैस हरियाणातील शेतकरी नवीन सिंह यांनी खरेदी केली आहे. तिचे वजन सुमारे 1500 किलो आहे, असे सांगितले जात आहे. या म्हशीचे नाव गोलू-2 असे आहे. तिच्या वजनाप्रमाने तिचा आहार देखील तेवढाच मजबूत आहे.

ही म्हैस एका दिवसाला सुमारे 30 ते 40 किलो अन्न खाते. तिच्या खाण्यावर तब्बल दररोज 10 हजार रुपये खर्च येतो. एवढेच नव्हे तर चारा, देशी तूप, मोहरीचे तेल आणि हंगामी फळे देखील या म्हशीला दिली जातात. यासाठी दर महिन्याला नवीन सिंह यांना सुमारे 3 लाख रुपये खर्च येतो.

गोलू-2 या म्हशीची उंची 5.6 फूट आहे. तिची लांबी सुमारे 14 फूट आहे. म्हशीच्या वी’र्या’पा’सू’न नवीन सिंह हे दरमहा सुमारे 12 लाख रुपये कमावतात. या म्हशीच्या वी’र्या’ला खूप मागणी असते.

नवीन सिंह हे गोलू-2 या म्हशीची नीट काळजी घेतात. त्यांनी म्हशीच्या देखरेखीसाठी 12 राखणदार तैनात केले आहेत. या म्हशीला बरीच मागणी येते. मात्र, नवीन सिंह गोलू-2 या म्हशीला विकत नाहीत. सध्या गोलू-2 या म्हशीची सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page