शेतकऱ्याच्या मुलीची अनोखी कला, तब्बल एक तास पाण्यावर कोणतीही हालचाल न करता तरंगते

पोहण्याचे अनेक प्रकार आपण पाहत असतो. पोहण्यामुळे आपल्या श्वसनाच्या समस्या दूर होतात. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पोहण्याचा आनंद लुटत असतात. परंतु, आज आपण अशा एका मुली बद्दल जाणून घेणार आहोत जी न पोहता तब्बल एका तासाहून अधिक वेळ कुठलीही हालचाल न करता पाण्यावर तरंगते.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील रांजणी या गावची रहिवासी असलेली वैष्णवी वाघ हिचे वडील सुधीर वाघ हे शेतकरी आहेत. मागील दोन वर्षांच्या काळात अनेकवेळ घरात असल्याने अनेकजण आपआपली कला जोपासताना आपण सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून पहिलेच असेल. जसे की चित्र काढणे, नवनवीन पदार्थ बनवणे, व्हिडिओज बनवून लोकांचे मनोरंजन करणे, वेगवेगळ्या वस्तू तयार करणे इत्यादींवर आपण आपला वेळ घालवला.

याचदरम्यान वैष्णवीने आपल्या वडिलांकडे पोहण्याचा हट्ट धरला होता. ती घराबाजूच्या विहरीत रोज सराव करायची. रोजच्या सरावामुळे खूप कमी वेळात ती उत्तम पोहायला शिकली होती. पोहत असताना तिला दम लागला की ती उलटी होऊन पाण्यावर तरंगायची.

त्यावेळेस सतत सराव करत असल्यामुळे ती पाण्यावर कुठलीही हालचाल न करता बराच वेळ तरंगू लागली. सुरुवातीला थोडा कमी वेळ तरंगू लागली. मग हळूहळू ती तब्बल एका तासाहूनही अधिक वेळ पाण्यात कोणतीही हालचाल न करता तरंगू लागली.

वैष्णवीची ही पाण्यावर तरंगण्याची कला पाहून सगळे आश्चर्यचकित होऊ लागले. तिच्या आईवडिलांना ही तिच्या या अनोख्या कलेचे कौतुक वाटू लागले. आता वैष्णवीला देखील यामध्येच पुढे आपले करिअर करायचे आहे, असे ती म्हणते.

वैष्णवीच्या ही पाण्यावर तरंगण्याची कला सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरली आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तिच्या या वेगळ्या कलेचे अनेकजण कौतुक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page