आनंदाचे वातावरणात क्षणात दुःखात बदलले, मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी वाटत पाहत होते तेवढ्यात..

दीक्षितपूर येथील रहिवासी असलेला 20 वर्षीय धर्मेंद्र कुमार याचा शनिवारी वाढदिवस होता. त्यामुळे तो मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर धर्मेंद्र हा घरी परतत होता.

धर्मेंद्रच्या मित्रांनी पार्टी झाल्यानंतर त्याला कॉलेज परीसरात सोडले. त्यांनतर त्याचे मित्र निघून गेले आणि धर्मेंद्रने घरी जाण्यासाठी कॉलेजमधून आपली सायकल घेण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवरून पलीकडे उ’डी मारली.

यादरम्यान ओव्हरब्रिज ओलांडत असताना धर्मेंद्र एका टोकावरून दुसऱ्या टोकावर उडी मारत होता आणि याच दरम्यान दुभाजका वरुन उडी मारताना त्याचा तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. ब्रिज ची उंची सुमारे 60 फूट असल्याने धर्मेंद्रचा खाली पडून जागीच दु’र्दै’वी मृ’त्यू झाला.

या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या तरुणाचा मृ’त’दे’ह श’वि’च्छे’द’ना’सा’ठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर धर्मेंद्रच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या तरुणाने स्टं’ट करण्याच्या नादात हा अ’प’घा’त झाला असावा अशी माहिती समोर आली आहे. नेहमी येथे तरुण स्टंटबाजी करत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस याचा अधिक तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.

घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय वाट बघत असताना तरुणाऐवजी त्याचा मृ’त’दे’ह घरी पोहचला. एका चुकीमुळे तरुणाला आपला जीव ग’म’वा’वा लागला आहे. या घटनेनंतर परीसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page