एकेकाळी शेतात रोजंदारीवर काम करणारी आजी आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री..

एखादी गोष्ट करून दाखवण्याची हिंमत आपल्यात असेल तर कोणत्याही अडचणी तुमचा मार्ग रोखू शकत नाहीत. आपण आयुष्यात अनेक लहानसहान गोष्टींमुळे निराश होतो आणि सतत त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. परंतु असे अनेक जण आहेत ज्यांच्याकडे काहीही नसताना ते केवळ कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आलेल्या संधीचे सोने करतात आणि स्वप्नातही विचार केला नाही असे काम करुन दाखवतात.

आज आपण अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे ना पुरेसे शिक्षण आहे, ना त्यांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, प्रतिकूल परीस्थितीवर मात करत उतारवयात ह्या महिलेने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

तेलंगानाच्या लम्बाडीपल्ली गावातील रहिवासी असलेल्या 62 वर्षीय मिल्कुरी गंगव्वा यांची जीवनकहाणी खऱ्या अर्थाने एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. मिल्कुरी गंगव्वा या फक्त पहिलीपर्यंत शिकल्या आहेत. लग्नानंतर त्यांचे पती दा’रू पिऊन त्यांना खूप मा’र’झो’ड करायचे.

गरीबी आणि शिक्षण नसल्याने मजुरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. कुटुंबातील 5 लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. स्वत: शिकलेल्या नसल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहित होते त्यामुळे त्यांनी आपल्या 4 मुलांच्या शिक्षणात कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यामुळेच त्यांची मुले आज उच्च शिक्षित आहेत तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेली आहेत.

मिल्कुरी गंगव्वा यांचे जावई श्रीकांत श्रीराम यांचे ‘My Village Show’ या नावाचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर ते आपल्या गावातील गोष्टी तसेच कधीकधी विनोदी व्हिडिओ देखील पोस्ट करत असतात. त्यांचे हे चॅनेल स्थानिक भाषिकांना खूप आवडत असल्याने त्यांचे हे चॅनेल मोठ्या प्रमाणात पाहिले जाते.

एकदा श्रीकांत यांनी एका व्हिडिओ मध्ये त्यांच्या सासूला म्हणजेच मिल्कुरी गंगव्वा यांचा एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओ मध्ये गंगव्वा यांचा साधाभोळा आणि निरागस चेहरा अनेकांना आवडला त्यामुळे हा व्हिडिओ काही दिवसांतच प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांनतर पुढे आजींच्या जावयाने त्यांना घेऊन अजून काही व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. यात काही व्हिडिओमध्ये गंगव्वा अभिनयही करायच्या. त्यांचे सर्व व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’वर प्रचंड व्हायरल व्हायला लागले.

सो’श’ल मी’डि’या’वर त्यांना पसंती मिळाल्यानंतर त्यांना अनेक तेलगु चित्रपटामधून ऑफर आल्या. तसेच टीव्ही सीरियलमधून देखील ऑफर यायला लागल्या होत्या. त्यांनी त्या ऑफर्स स्वीकारल्या आणि त्यांनी पुढे बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि एका टिव्ही शोमध्येही काम केले आहे. \

मिल्कुरी गंगव्वा यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल इतक्या त्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. एक रोजंदारी मजूर ते एक सुप्रसिद्ध अभिनेत्री हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page