भावा मानलं तुला! फक्त 3 हजार रुपये खर्च करून दहावीच्या विद्यार्थ्याने भंगारातून बनवली ‘जुगाड बाईक’

जवळपास प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की त्याच्याकडे स्वतःची बाईक असावी. इतर मुलांप्रमाणेच दहावीत शिकणाऱ्या रजनीश कुमार याला देखील एक महागडी बाईक घ्यायची होती. परंतु त्याला महागडी बाईक घेणे परवडणार नव्हते तसेच पैशांची चणचण असल्यामळे तो ती घेऊ शकला नाही. मात्र, भंगारातून वस्तू खरेदी करून करून बाईक बनवण्यात तो यशस्वी झाला आहे.

चला तर मग पाहूया त्याने कशी बनवली ही ‘जुगाड बाईक’. रजनीश कुमार याने सांगितल्यानुसार, त्याच्याकडे महाग बाईक घेण्यासाठी पैसे नव्हते. परंतु, बाईक चालवायची इच्छा मात्र खूप होती, यासाठी त्याने स्वस्तात बाईक बनवण्याचे ठरवले म्हणजे शाळेत अथवा कुठेही जाणे सोपे होईल असा विचार त्याने केला. त्यासाठी त्याने शेतात वापरले जाणारे पेट्रोलवर चालणारे फवारणी करणारे यंत्र भंगारातून खरेदी केले.

भंगारातून त्याने हे यंत्र खरेदी केले आणि त्याची मोटार काढली आणि ती दुरुस्त केली. मोटारसायकलचेही काही सामान घेतले आणि सायकलमध्ये थोडे बदल करून ती मोटार त्यात बसवली. 1 आठवडा त्यावर मेहनत करून त्याने त्या सायकलचे अखेर बाईकमध्ये रूपांतर केले. त्याची ही बाईक ताशी 30 किलोमीटर वेगाने धावते आणि 1 लीटर पेट्रोलमध्ये 120 किलोमीटरचे अंतर सहज रीत्या पार करते.

सध्या त्याच्या या जुगाड बाईक ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भंगारातून वस्तू खरेदी करून या मुलाने आपले अनोखे कौशल्य दाखवले आहे. सर्वजण आता त्याची बाईक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page