लाडक्या मुलीचे लग्न उद्यावर येऊन ठेपले होते मात्र, आदल्या दिवशीच वडिलांचे छत्र हरपले..

मुलीचे लग्न हा वडीलांच्या आयुष्यातील अगदी आनंदाचा त्याचप्रमाणे अत्यंत भावुक असा क्षण असतो. मुलीचे लग्न म्हटले की वडिलांचा उत्साह काही औरच असलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. अशा परस्थितीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे राहणारे रघुवंशी व्यापारी अशोक यांची मुलगी आयुषी हिचे लग्न होते. आयुषी ही अहमदाबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. अशोक यांच्या लाडक्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांनी मुलीच्या विवाहासाठी जोरात तयारी करण्यास सुरुवात केली होती.

आपल्याला माहीत आहेच की, लग्न म्हटले की उत्साह हा आलाच. त्याचप्रमाणे हे कुटुंब देखील आनंदाने मुलीच्या लग्नाची तयारी करत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्नाच्या आदल्या दिवशी जे घडले ते हृदय पिळवटून टाकणारे होते.

मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर दुपारी अशोक हे अचानक आजारी पडले. त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता, त्यामुळे त्यांना त्वरित राजकोट मधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा दुर्दैवी अं’त झाला.

अशोक आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी खूप उत्साहात होते. खूप दिवस अगोदरपासून ते तयारी करत होते. उद्या तो दिवस येणार इतक्यात काळाने त्यांच्यावर घा’ला घातला. वडिलांच्या आकस्मित नि’ध’ना’नं’त’र आयुषीला खूप धक्का बसला. तिचा आक्रोश पाहून उपस्थित सगळेच नातेवाईक भावुक झाले होते.

अशोक यांच्या आकस्मित नि’ध’ना’मु’ळे संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीच्या लग्नासाठी आतुर असलेल्या वडिलांचे दुःखद नि’ध’न झाल्याने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page