शहरातील चांगली नोकरी सोडून तरुणी आपल्या गावी परतली, सरपंच बनून गावाचे रूप पालटून टाकले..

गावात राहणाऱ्या अनेकांचे शहरात जाऊन शिक्षण घेण्याचे व नोकरी करून कायमचे शहरात राहण्याचे स्वप्न असते. असा विचार केल्यामुळे गाव मागासलेली आणि सुविधांपासून वंचित राहतात. परंतु राजस्थानच्या या कन्येने याउलट करून दाखवले आहे.

राजस्थान येथील जयपूरमधील सोडा गावातील कन्या छवी राजावत ह्या एक सामान्य कुटूंबातील मुलगी आहे. छवी यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण आंध्र प्रदेश येथील ऋषी व्हॅली स्कूल मधून पूर्ण केले. त्यांनतर अजमेरच्या मेयो कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.

पुढे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर छवी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, पुणे येथून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर शहरात राहून त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, कार्लसन ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि भारती एअरटेल अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली.

परंतु छवी यांनी नोकरीतून फारसे समाधान मिळत नव्हते. कारण त्यांना आपल्या गावासाठी आणि देशासाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी आपल्या गावात परिवर्तन घडवायचा निर्धार केला. यानंतर छवी यांनी आपली शहरातील चांगली नोकरी सोडली आणि त्यांच्या गावी परत आल्या. पुढे त्यांनी 4 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून निवडणूक जिंकली.

निवडणूक जिंकल्यानंतर छवी यांनी सोडा गावची सरपंच होऊन गावासाठी अनेक चांगली मोठी कामे केली. गावात राहून रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा, काँक्रिटचे रस्ते तसेच 24 तास वीज उपलब्ध करून देणे अशी अनेक महत्त्वाची कामे केली.

छवी यांनी गावाचा सरपंच म्हणून जीन्स आणि स्टायलिश टॉपमध्ये पाहणे हा परदेशी लोकांसाठीही एक नवीन अनुभव होता. स्त्रियांची भयभीत आणि संकोच असलेली प्रतिमा मोडीत काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

छवी यांनी आपल्या गावाचा दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घेऊन गावासाठी अनेक कामे केली. बा’ल’म’जु’रीविरोधातही त्यांनी काम केले आहे. 2020 पर्यंत गावातील सर्व मुलांना शिक्षण मिळावे आणि शिक्षणाचा स्तर 100 टक्के वाढावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती सत्यात देखील उतरवली.

त्यांना गावाचा सर्वांगीण विकास करायचा होता, म्हणून त्यांनी गावात दा’रू आणि हुं’डा प्रथेवरही बंदी घातली. अशा प्रकारे त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांनी सोडा गावाला आज जागतिक पटलावर ओळख मिळवून दिली आहे.

छवी राजावत यांनी आपल्या उल्लेखनीय कार्यातून देशातील अनेक तरुणांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. छवी राजावत ही देशातील सर्वात तरुण आणि एकमेव एमबीए सरपंच आहेत. तसेच त्या 2013 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेच्या संचालक आहेत.

छवी यांनी शहरी जीवन सोडल्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही. भारतातील तरुण पिढीने गावाप्रती आपली जबाबदारी समजून घेऊन त्यांनी काम करावे, असे त्यांना वाटते. त्यांनी अनेक स्त्रियांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page