पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका देण्यास दिला नकार, मोटरसायकलवरून मुलीचा दे’ह घेऊन केला 68 किमीचा प्रवास

आजकाल लोकांमधली माणुसकी हळूहळू संपत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यापासून 68 किमी अंतरावर असलेल्या एन्कुर मंडलयेथील कोथामेडेपल्ली येथील रहिवासी असलेले वेट्टी मल्ला आणि आदि या दाम्पत्याची तीन वर्षांची मुलगी सुक्की हिला खूप ताप आला होता. त्यामुळे सुक्कीला तत्काळ उपचारांसाठी एनकूर येथे असलेल्या प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर सुक्कीची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला सोमवारी सकाळी खम्मम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तेथे सुक्की हीचा उपचारांदरम्यान दुर्दैवी अं’त झाला. मुलीच्या आकस्मिक नि’ध’ना’मु’ळे तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

या गरीब दाम्पत्याला आपल्या मुलीचा मृ’त’दे’ह घेऊन आपल्या मूळ गावी कोथामेडेपल्ली येथे जायचे होते. त्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे रुग्णवाहिकेचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. अशा परिस्थितीमध्ये शासकीय रुग्णालयाने सुद्धा त्यांना रुग्णवाहिका देण्यास नकार दिला.

अशा परिस्थितीमध्ये वेट्टी मल्ला हे आपल्या गावी गेले आणि त्यांनी आपल्या गावातील लोकांना मदत करण्याची कळकळीची विनंती केली. त्यांनतर गावातील एका तरुणाने त्यांना मोटारसायकल दिली.

यानंतर नाईलाजाणे या दाम्पत्याने आपल्या मुलीचा मृ’त’दे’ह 68 किमी अंतर असलेल्या आपल्या मूळ गावी नेण्यासाठी मोटारसायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. मुलीचा मृ’त’दे’ह तिच्या आईने मांडीवर घेऊन 68 किमीचा प्रवास पार केला.

मुलीचा मृ’त’दे’ह नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही दया दाखवली नाही. या दाम्पत्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे स्थानिक लोकांनी आणि मुलीच्या आईवडिलांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page