खेळता खेळता चिमुकल्याने खायची गोष्ट समजून एक रुपयाचे नाणे तोंडात टाकले, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी पहिले आणि..

लहान मुलं म्हटले की दंगा मस्ती ही होणारच. काहीना काही खोड्या ते सतत करतच असतात. भान विसरून मस्ती करत असताना कधी कधी त्यांना दुखापत होते. अशा वेळेस पालकांना त्यांच्यावर खूप लक्ष द्यावे लागते. नेहमी त्यांना सतर्क राहावे लागते. जराही निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर बेततो, असे म्हणतात. याचाच प्रत्यय बुलढाणा मधून समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधील राहणारा तीन वर्षांचा मोहम्मद आशिर हा मुलांसोबत खेळत होता आणि खेळता खेळता त्याला एक रुपयांचे नाणे सापडले. खायची गोष्ट आहे असे समजून त्याने ते नाणे तोंडात टाकले.

या चिमुकल्याकडे आईवडिलांचे लक्ष नव्हते त्याच वेळेस नेमके त्याने हे नाणे तोंडात टाकले. आपण अनेकदा लहान मुलांनी नाणी गी’ळ’ल्या’च्या घटना ऐकल्या आहेत. अशा वेळेस मुलांना केळी खायला दिली जातात. जेणेकरुन नाणे मुलांच्या वि’ष्टे’द्वा’रे बाहेर पडू शकेल. परंतु या चिमुकल्याच्या बाबतीत जर वेगळेच घडले.

चिमुकल्याला श्वा’स घ्यायला त्रा’स होऊ लागला. त्याचा श्वास गु’द’म’रू लागला. यामुळे त्याचे आई-वडील घाबरून गेले. त्यांना काय करावं हे सुचत नव्हते. त्यांनी आपल्या चिमुकल्याला घेऊन त्वरित रुग्णालय गाठले.

रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी ए’क्स’रे काढल्यानंतर त्यांना धक्काच बसला. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चिमुकल्याने नाणे तोंडात टाकल्यानंतर ते गिळले न जाता त्याच्या श्वास नलिकेत जाऊन अडकले आहे, असे ए’क्स’रे मधून स्पष्ट झाले. हे ऐकून चिमुकल्याच्या आईवडिलांना जबर धक्का बसला. त्यांना खूप चिंता वाटू लागली.

हे नाणे बाहेर काढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर डॉक्टरांनीही अनेक प्रयत्न केले आणि अखेर फो’लि’ज कॅ’थे’ट’र’च्या मदतीने हे नाणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला. चिमुकला सुखरूप आहे हे पाहून त्याच्या आईवडिलांच्या जीवात जीव आला.

अथक प्रयत्न करून डॉक्टरांनी या 3 वर्षीय चिमुकल्याचा जीव वाचवला म्हणून त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page