पिकाला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करताना स्टार्टरला हात लावताच जागीच झाला दु’र्दै’वी मृ’त्यू..

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ गावचे रहिवासी असलेले उत्तम भीमराव हाके यांची गावात पाच एकर शेती आहे. त्यांनी कापसू या पिकाची लागवड केली आहे. ते सकाळी सहा वाजेच्या सुमारस काहीही न खाता शेतात कापसू पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

शेतात गेल्यानंतर शेतीला पाणी देण्यासाठी ते मोटर चालू करण्यासाठी गेले. मोटर चालू करताना स्टार्टरला हात लावल्यानंतर त्यांना अचानक झटका बसला आणि खाली पडून त्यांच्या जागीच दु’र्दै’वी अं’त झाला.

एवढा वेळ झाला तरीही उत्तम घरी आले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने मुलाला शेतात पाठवले असता उत्तम हे खाली पडल्याचे दिसून आले. वडीलांना अचानक काय झाले म्हणून मुलाने शेजारी शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांना बोलावले. त्यांनी येऊन पाहिले असता उत्तम हे विजेचा शॉ’क लागून जागेवरच मृ’त्यू’मु’खी पडल्याचे समजले.

ही बातमी ऐकून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मोठ्याने आक्रोश करत होता. उत्तम यांच्या कुटुंबियांना ही माहिती मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांनी उत्तम हाके यांचा मृ’त’दे’ह गंगाखेड तालुक्यातील रुग्णालयात श’व’वि’च्छे’द’ना’सा’ठी पाठवला. या घटनेमुळे संपुर्ण परीसरात शो’क’क’ळा पसरली आहे. या परिसरात सर्वत्र शेतात विद्युत तारांची अवस्था खराब झालेली आहे.

यामुळे सगळ्यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना सारखे शेतात काम करण्यासाठी जावे लागत असल्यामुळे लवकरात लवकर या तारांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page