पोटच्या मुलांनी बापाला घराबाहेर काढले, मुलींनी देखील त्यांच्या घरी ठेवण्यास दिला नकार..

वृद्धाकाळात आईवडिलांना स्वतःचेच घर हे परके वाटायला लागते. आसपास घडणाऱ्या काही घटना पाहिल्या की अक्षरशः अंगावर काटा येतो. ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन आपल्या मुलाबाळांना वाढवले, तीच मुले मोठी झाली की आई-वडिलांना विसरतात, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. अशीच एक घटना लखनऊ येथून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील जुने टिकेतगंज येथे 85 वर्षीय रामेश्वर प्रसाद यांचे घर आहे. काही काळानंतर वाढत्या वयानुसार त्यांनी हे काम करायचे बद केले. त्यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत.  आता 4 ही मुलींची लग्न झालेली आहेत आणि दोन्ही मुले वाहन चालकाचे काम करतात. दोन्ही मुले चांगली कमवती असूनही मुलांना आपले वडील नकोसे झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून त्यांची दोन्ही मुले त्यांचे वडील रामेश्वर यांचा छ’ळ करत आहेत आणि त्यांना मा’र’हा’ण देखील करत आहेत. दुसरीकडे अनेकदा म्हटले जाते की ज्यांना मुलं आहेत त्या आईवडिलांना म्हातारपणाची काळजी नसते.

परंतु समाजात अशा काही घटना घडतात की यावरचा विश्वासच उडून जातो. असेच काहीसे रामेश्र्वर यांच्या बाबतीत घडले आहे. मुलांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी घर सोडले. मुलांनी केलेल्या छ’ळ आणि मा’र’हा’णी विरूध्द त्यांनी पोलिस ठाण्यात त’क्रा’र नोंदवली आहे.

मी आता कमवत नाही त्यामुळे मी आता मुलांसाठी ओझं झालो आहे आणि या वयात मला काम करणे देखील शक्य नाही. यामुळे माझा मुलांनी मला घरात ठेवण्यास नकार दिला, असे ते म्हणतात. या त्रासाला कंटाळून ते हातात बॅग घेऊन रस्त्यावर फिरत होते. तेव्हा वन स्टॉप सेंटर यांच्या टीमच्या मदतीने त्यांना पोलिस ठाण्यात आणले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मुलांमध्ये वडिलांना घरात ठेवण्याबाबत वाद सुरू होते. त्यांची दोन्ही मुले त्यांचा छ’ळ करत होते. त्यांना अ’प’मा’ना’स्पद वागणूक दिली जात होती. तसेच त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना मा’र’हा’ण देखील केली आहे, अशी त’क्रा’र त्यांनी केली आहे.

तब्येत बिघडल्यानंतर ते बलामपूर येथील रुग्णालयात दाखल झाले होते. तिथून त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते घरी गेले तेव्हा त्यांना मुलांनी घरात घेण्यास नकार दिला. ते आपल्या मुलींकडे गेले आता मुलींनी देखील त्यांना त्यांच्याकडे राहण्यास नकार दिला, असे त्यांनी सांगितले.

म्हातारपणी आपल्या मुलांचाच एकमेव आधार असतो. मात्र, मुलंच जर अशी वागणूक देत असतील तर आईवडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची काहीच किंमत उरत नाही, असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page