सातारा पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी! वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे 21 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यात आले यश..

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा- कोरेगाव रस्त्यावरून एक खाजगी बस शनिवारी शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी कोरेगावच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये शाळेतील 21 विद्यार्थी होते. खावली गावा नजीक अचानक चालत्या बसमध्ये शॉ’र्ट’स’र्कि’ट झाल्याने या बसने पेट घेतला.

यादरम्यान आपली ड्युटी संपवून चाललेल्या सातारा येथील पोलिसाला ही बाब समजताच त्यांनी त्वरित बस चालकाला बस थांबण्यास सांगितले. बस थांबवल्यानंतर ताबडतोब बसमधील 21 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. अचानक शॉ’र्ट’स’र्कि’ट झाल्यामुळे बसने पेट घेतला होता आणि यामुळे धुराचे लोट तयार झाले होते.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूने जाणारे प्रवासी देखील हा भीषण प्रकार पाहून थांबले. यावेळी त्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बसला लागलेली आ’ग विझवली.

या घटनेत कोणतीही जीविहानी झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वेळीच विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सगळ्यांनी आभार मानले. तसेच सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page