आईने घरोघरी बांगड्या विकून मुलाला शिकवले, संघर्षातून वाट काढत मुलाने IAS अधिकारी होऊन आईचे नाव मोठे केले..

यश ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी अनेकांना खूप खस्ता खाव्या लागतात. साधारणतः आपल्या वयाचा 25 ते 35 या दहा वर्षांचा कालखंड हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या दहा वर्षातील केलेल्या कामावर आपले आयुष्य अवलंबून असते. या काळात अनेकजण रात्रंदिवस कष्ट करून जिद्द्याच्या जोरावर यशस्वी होतात. आज आपण अशाच एका मेहनती आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात अत्यंत गरीब घरात रमेश घोलप यांचा जन्म झाला. रमेश यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावी पूर्ण केले आणि नंतर त्यांना त्यांच्या काकांकडे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले.

रमेश यांचे वडील पंक्चर दुकानात काम करायचे. त्यांच्या कुटुबियांसाठी हा एकमेव उदरनिर्वाह करण्याचा मार्ग होता. परंतु वडील नेहमी दा’रू प्यायचे त्यामुळे त्यांना अनेकदा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांच्या आईने आजूबाजूच्या परिसरात बांगड्या विकण्यास सुरुवात केली. या कामामध्ये रमेश आणि त्यांचा भाऊ देखील त्यांच्या आईला मदत करू लागले.

याचदरम्यान आणखी एक संकट पुढ्यात आले आणि रमेश यांच्या डाव्या पायाला पो’लि’ओ झाला. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवली. शिक्षणामुळेच आपले दारिद्र्य संपू शकते यावर त्यांचा विश्वास होता. रमेश बारावीच्या परीक्षेची तयारी करत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे नि’ध’न झाले. वडिलांच्या अं’ति’म सं’स्का’रा’सा’ठी जाण्यासाठी त्यांच्याकडे 2 रुपये देखील नव्हते. शेजाऱ्यांच्या मदतीने ते त्यांच्या घरी पोहचले.

वडील गेल्यानंतर घोलप कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, आता आपल्यालाच कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे आणि यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल हा विचार मनाशी पक्का करून रमेश यांनी 88% सह 12 वी उत्तीर्ण केली. बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आणि ते 2009 मध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली.

यावर त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यांनी पुढे युपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला. रमेश यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडली आणि युपीएससी परिक्षाची तयारी करण्यास सुरूवात केली. अखेर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि आयएएस अधिकारी म्हणून नियुक्त झाले.

आज रमेश घोलप कोडरमा, झारखंडचे उपायुक्त म्हणून आपले कार्य बजावत आहेत. आपल्या बाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांसाठी काहीतरी चांगले करण्याची संधी मिळावी यासाठी ते दररोज प्रयत्न करत असतात. त्यांनी समाजामधील अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते नेहमीच झटत असतात.

त्यांचा प्रवास संघर्षमय असला तरी त्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती देखील कधीच हार मानली नाही. जिद्दीने ते पुढे जात राहिले. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page