NEET परीक्षेमध्ये 570 गुण मिळाले म्हणून खूप आनंदात होती, मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा निकाल तपासल्यानंतर..

तुमच्याबाबतीत असे काही घडले आहे का की, एखाद्या परीक्षेत आधी तुम्हाला चांगले गुण मिळाले आहेत आणि याबाबत तुम्ही आनंद देखील व्यक्त केला पण नंतर ते कमी झाले असल्याचे समजले तर? परंतु अशी घटना चंद्रपूर मधून समोर आली आहे.

चंद्रपुर येथील रहिवासी असलेली देवती मोरे हिने यावर्षी NEET ची परीक्षा दिली. 7 सप्टेंबरला रात्री या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. NTA ने NEET परीक्षेची उत्तर पत्रिका आणि OMR शीट वेबसाईट वर अपलोड केली होती.

देवतीने 7 सप्टेंबरला रात्री तिचा निकाल पहिला. देवतीला NEET परीक्षेमध्ये 570 गुण मिळाले होते. तिला निकाल पाहतेवेळी नेटवर्कची खूप समस्या येत होती म्हणून तिचा निकाल डाऊनलोड होत नव्हता त्यामुळे तिने टॅबवर तिच्या निकालाचा स्क्रीनशॉट बाजूला काढून ठेवला होता.

8 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता देवतीने पुन्हा तिचा निकाल वेबसाइट वर चेक केला. तेव्हाही तिला त्यात 570 गुण मिळालेले दिसत होते परंतु तेव्हा ही तिचा निकाल डाऊनलोड होत नव्हता. पुढे त्या दिवशी रात्री 9 वाजता देखील तिने आपला निकाल चेक केला. तेव्हाही ही तिला तोच रिझल्ट मिळाला. तिला मिळालेल्या या उत्तम गुणांमुळे ती खूप खुश होती. तीच्या घरचे ही अतिशय आनंदात होते.

परंतु त्याच्या पुढच्या दिवशी वेबसाईटवर लॉग इन करून तिने पहिले तेव्हा तिला धक्का देणारी गोष्ट समोर आली. तुम्हाला ही हे जाणून आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत देवती पाहत आलेली तिचे 570 गुण आता चक्क 129 गुण झाले होते. हे पाहून तिला वाटले की काहीतरी तांत्रिक गडबड झाली असेल. त्यामुळे एवढे कमी गुण दिसत असतील म्हणून तिने पुन्हा लॉग इन करून पाहिले परंतु तेव्हा ही तिला 129 च गुण दिसले. यामुळे तिने लगेच NTA ला मेल केला. मात्र त्यावर समोरून काहीही उत्तर आले नाही, असे देवतीने सांगितले.

सर्वप्रथम वेबसाईट वर तपासले असता माझा मुलीला 570 गुण मिळाले होते असे वेबसाईट वर दिसत होते आणि दुसऱ्या दिवशी निकाल तपासल्यांनतर तिला आधीपेक्षा कमी गुण मिळालेले दिसले. यामुळे माझी मुलगी खूप टेन्शन मध्ये आहे. दोन दिवसांपासून तिने अन्न देखील ग्रहण केलेले नाही. या समस्येसाठी आम्ही आता काय करावे? याबाबत कोणाकडे आम्ही न्याय मागावा? असे प्रश्न देवतीची आई अर्चना मोरे यांनी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page