पतिच्या बालपणीचा फोटो पाहून पत्नीला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “मला वाटले नव्हते..

इक्‍वाडोर देशात राहणारे एका दाम्पत्य एलिज मेलिना आणि पेड्रो यांचे काही महिन्यापूर्वीच प्रेम विवाह झाला आहे. एलिज 17 वर्षांची होती तेव्हा एका विद्यापीठाच्या बाहेर पेड्रोला पहिल्यांदा ती भेटली होती. त्यांनतर पुढे दोन-तीन आठवड्यांनी पेड्रो यांनी एलिजला प्रपोज केले. पुढे त्यांनी 6 वर्ष एकमेकांना डे’ट केल्यानंतर दहा महिन्यापूर्वी हे दोघं लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर एके दिवशी 26 वर्षीय एलिज मेलिना ही आपल्या नवऱ्याचे जुने अल्बम पाहत होती. तेव्हा तिला अचानक त्याच्या लहानपणीच्या फोटोंमध्ये तिच्या स्वत:चा फोटो दिसला. तो फोटो पाहून तिला थोडा आश्चर्याचा धक्काच बसला.

त्या फोटो मध्ये ती आणि तिचा पती हे दोघे ही एकाच फ्रेममध्ये होते आणि तिला त्या गोष्टीची कल्पनाही नव्हती. हा फोटो 15 वर्षांपूर्वीचा आहे. या फोटो मध्ये असलेला मुलगा आता तिचा पती पेड्रो आहे.तेव्हा तिला हाच आपला पती होईल, याची जराही कल्पना नव्हती. एलिज तिच्या आईसोबत दरवर्षी शहरात होणाऱ्या परेडला जायची हा फोटो तेव्हाचा असेल असे ती म्हणते.

“हा जुना फोटो पाहून आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटले. आमचा यावर विश्वासच बसत नव्हता. हे अनेकांना खोटे वाटेल, पण हे सत्य आहे. आम्ही एकत्र यावे अशी देवाचीच इच्छा असावी असे आम्हाला वाटते,” असे एलिज म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page