शेतकरी कुटुंबातील मुलगी सीईटी मध्ये 100 पर्सेन्टाइल गुण मिळवुन राज्यात प्रथम आली..

बारामती: व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनेक स्पर्धा परीक्षा आयोजीत करण्यात येतात. त्यातील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये आपल्या राज्यातील मुलगी प्रथम आली आहे.

वसुधा गंगाधर फडतरे ही बारामती मधील शारदनगर येथील असलेल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. वसुधा एक अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. ती एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे.

वसुधाने कोणतेही खाजगी कोचिंग क्लासेस न लावता फक्त कॉलेजमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनातून तसेच तिच्या मेहनतीने आणि कष्टाने या वर्षीच्या सीईटी परीक्षेमध्ये 100 पर्सेन्टाइल गुण प्राप्त करून राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

तिच्या कॉलेज मध्ये तिच्या व्यतिरिक्त आणखी 11 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. कॉलेजमधील शिक्षक मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवत असतात.

शंकांचे निरसन करण्यासाठी अधिक तासिका तसेच ऑनलाईन परिक्षेचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. एकाग्र होऊन अभ्यास करता यावा यासाठी ध्यान व योगा या उपक्रमांचेही आयोजन केले जाते.

या सर्व गोष्टींमुळे वसुधाला खूप फायदा झाला आणि तिला 100 पर्सेन्टाइल गुण मिळवण्यासाठी खूप मदत झाली. तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page