ऐकावे ते नवलच! पतीने रडत रडत गाठले पोलिस ठाणे, “पोलीस, मला वाचवा, माझी पत्नी, मला..

नवरा- बायकोमध्ये नेहमीच लहान-मोठ्या कारणांवरून सतत खटके उडत असतात. कधी कधी हे वाद लगेच मिटले जातात तर, कधी कधी या भांडणांचे रूपांतर वादात होते. नुकतीच अशी एक घटना उ. प्रदेश येथून समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधील हमीरपूर येथील पठाणपुरा परिसरात राहणाऱ्या संजय याने आपल्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात त’क्रा’र नोंदवण्यासाठी रडत रडत पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संजयने पोलिसांना विनंती करत “पोलिस, ‘मला वाचवा, माझी पत्नी, मला गरम चिमट्याने मारते”,असे म्हणू लागला.

पोलिसांनी पत्नी गरम चिमट्याने का मारते असे विचारले असता, संजयने संपुर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. संजयकडे एक कार आहे. ती कार विकून मिळणारे पैसे त्याच्या पत्नीला आपल्या माहेरी द्यायचे होते. यावर संजय यांनी आपली कार विकण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे रागात पत्नीने संजयला गरम चिमट्याने बेदम मा’र’हा’ण केली.

आपली पत्नी सतत अन्याय करत असल्याने या त्रासाला कंटाळून संजयने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पत्नीवर या संदर्भात योग्य ती का’र’वा’ई केली जावी अशी त्याने पोलिसांकडे मागणी केली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात, असे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले. या प्रकरणाची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page