ह्रदयाच्या थरकाप उडवणारी घ’टना! पत्नी कार चालवायला शिकत होती, अचानक नियंत्रण सुटले अन् गाडी थेट..

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील कुंभारी येथे एक दु’र्दै’वी घटना घडली आहे. या घटनेमध्ये पती आपल्या पत्नीला कार चालवायला शिकवत होता. या कार मध्ये पती-पत्नी आणि त्यांची मुलगी असे तिघही उपस्थित होते. पत्नी कार चालवत होती आणि पती तिला कार चालवण्याबाबत मार्गदर्शन करत होता.

कार चालवत असताना अचानक पत्नीचे कारवरील नियंत्रण सुटले. कार लवकर नियंत्रणात न आल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही विहीर कुंभारी गावच्या मधोमध आहे. त्यामुळे अंदाज न आल्याने ही कार भरधाव वेगाने थेट विहिरीत जाऊन कोसळली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अचानक आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची विहिरीजवळ एकच गर्दी जमा झाली. तेथील नागरिकांनी तत्काळ या कुटुंबाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. विहिरीत पडलेल्या या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने देखील खूप प्रयत्न केले. दरम्यान एका क्रेनच्या साहाय्याने पतीला विहिरीतून बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले.

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तोंडात पाणी गेल्यामुळे त्यांना तातडीने उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पत्नी आणि मुलगी या दोघींचा ही अजूनही शोध लागलेला नाही. तेथील नागरिकांनी पत्नी आणि मुलगी दोघी ही बु’डा’ल्या’चा संशय व्यक्त केला आहे. या दु’र्दै’वी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page