पोलिस साहेब, “कृपया माझे लग्न लावून द्या,” अशी अजब तक्रार घेऊन तरुणाने गाठले पोलिस स्टेशन, मग पोलिसांनी..

लग्नाचे वय झाले की प्रत्येकाच्या घरी मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली जाते. जास्तीत जास्त लग्नाचाच विषय घरी बोलला जातो. परंतु, आज आपण एक घटना पाहणार आहोत त्यात अगदी याउलट घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील जालोन तालुक्यातील शेखपूर गावातील रहिवासी असलेले शाहिद शाह यांचा 30 वर्षीय मुलगा मिठू हा लग्नासाठी विनंती अर्ज घेऊन चक्क पोलीस स्टेशनमध्ये गेला होता.

पोलिसांना अर्ज देताना त्याने सांगितले की, “पोलिस साहेब, माझे वय 30 वर्षे आहे तरीही अजून माझे लग्न झालेले नाही. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझे लग्न करत नाहीत आणि त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे. कृपया माझे लग्न लावून द्या,’ असा विनंती अर्ज घेऊन हा तरुण ओराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला.

पोलिसांना अर्ज देताना तो पुढे सांगतो की, माझे नातेवाईक मला माझे आयुष्य जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. या कारणास्तव मी बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहे. पण, घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजूनही माझ्या लग्नाचा विचार केलेला नाही. यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत आहे.

एवढेच नाही तर तो पुढे म्हणतो, लग्नानंतर तो आपल्या जोडीदारालाही नेहमी आनंदी ठेवेल. तसेच लग्न करून दिले तर तो पोलिसांचा सदैव ऋणी राहील, असेही त्याने सांगितले. मिठूच्या या विनंती अर्जामुळे पोलीसांना हसूच आवरले नाही. त्यांनतर पोलिसांनी तरुणाच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.

या तरूणाचे मानसिक आरोग्य ठीक नाही त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. यावर पोलिसांनी त्याच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्याचे लग्न देखील लावून देण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांनी या तरुणाची तसेच त्याच्या कुटुंबीयांची समजूत घालत तरुणाचे लग्न लावून द्या, जेणेकरुन त्याचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल असे सांगून त्यांनी त्या तरुणाला घरी पाठवले आहे. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र ही घटना तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page